अनलॉक4 मध्ये काय चालू आणि काय बंद?, ठाकरे सरकारची नियमावली पहा एका क्लिकवर!

मुंबई | राज्य सरकारने राज्यात 30 सप्टेंबरपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवलं आहे. यामध्ये ठाकरे सरकारने एक नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीनुसार राज्यातील कारभार चालणार आहे.

ठाकरे सरकारने जाहीर केलेल्या नव्या नियमावलीनुसार पुढील गोष्टी चालू करण्यासाठी सरकारने मान्यता दिलेली नाही. यामध्ये शाळा, कॉलेज तसंच शैक्षणिक संस्था 30 सप्टेंबरपर्यंत बंद राहणार आहेत. त्योबतच चित्रपटगृह, स्विमिंग पुल, बार आणि सभागृह बंद ठेवायला राज्य सरकारने सांगितलं आहे.

राज्यात आंतरराष्ट्रीय प्रवासाला बंदी आहे. मात्र जर केंद्रीय गृहमंत्रालयाने परवानगी दिली तरच राज्यात प्रवासाला परवानगी राहणार आहे. राज्यातील ज्या-ज्या जिल्ह्यामंध्ये मेट्रे आहे त्या मेट्रोला अद्यापही राज्य सरकारने हिरवा कंदील दिलेला नाही.

सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांवर अनलॉक4 मध्ये बंदी कायम राहणार असल्याचं राज्य सरकारने नव्या नियमावलीत सांगितलं आहे.

राज्यात चालू राहणाऱ्या गोष्टींमध्ये खालील गोष्टींनी सुरू ठेवण्यास सरकारने परवानगी दिली आहे. यामध्ये सध्या सर्वात मोठी गोष्ट म्हणजे राज्याच ई-पासची अट्ट नसल्याचं सांगितलं आहे. ई-पास बंद रद्द करण्यासाठी सरकारविरोधी विरोधकांनी आवाज उठवला होता.

राज्यातील हॉटेल आणि लॉज पुर्णपणे चालू करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. खाजगी कार्यालयातील 30 टक्के कर्मचाऱ्यांसोबत काम चालू करू शकतो.
प्रवासी तसंच मालाच्या आंतरराज्य प्रवासासाठी ई-पासची अट रद्द करण्यात आला आहे.

प्रवासासाठी आता ई-पासची अट नसणार आहे. त्यामुळे खाजगी वाहने नेहमीप्रमाणे विना ईपासशिवाय प्रवास करू शकतात. त्यासोबतच खासगी बस, मिनी बस तसंच इतर ऑपरेटर्सना परवानगी देण्यात आली आहे.

सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीत अजुनही व्यायामशाळा आणि मंदिर खुली करण्याबाबत कोणतीही घोषणा अद्यापही केली नाही.  राज्यात मंदिर खुली करण्याची मागणी मोठ्या प्रमाणात जोर धरू लागली आहे. त्यामुळे अनलॉक 4 मध्ये सरकार व्यायामशाळा आणि मंदिर खुली होण्याबाबत घोषणा असणार असण्याची शक्यता होती.

 

महत्वाच्या बातम्या-

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुखर्जींचा आशिर्वाद घेतानाचा फोटो ट्विट करत वाहिली श्रद्धांजली

प्रणव मुखर्जींच्या जाण्याने आपल्या राष्ट्राने एक रत्न गमावला- छत्रपती संभाजीराजे

देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं निधन

अंतिम वर्षाच्या परीक्षा केव्हा आणि कशा पद्धतीने होणार?; राज्य सरकारने केलं जाहीर!

इतर राज्याची सुरक्षा हवी असेल तर आपलं चंबू गबाळ आवरावं, हा काय तमाशा चाललाय- संजय राऊत