देशभक्ती म्हणजे काय???… मनीष सिसोदियांचा भाजपला कानमंत्र!

नवी दिल्ली |  भाजपने दिल्ली विधानसभा निवडणुकीचा सामना देशभक्त विरूद्ध देशद्रोही असाच रंगविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र धार्मिक ध्रुवीकरणाला बाजूला सारत दिल्लीच्या जनतेने पुन्हा आम आदमीचंच दिल्लीवर राज्य आणलं आहे. दिल्ली जिंकल्यानंतर आता उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी भाजपला देशभक्तीची व्याख्या समजावून सांगितली आहे.

लोकांना वीज, शिक्षण आणि पाणी देणं ही खरी देशभक्ती असल्याचा टोला सिसोदीया यांनी भाजपला लगावला आहे. जे लोक कामाला पसंती देतात तेच लोक देशभक्त असतात. सरकारचं काम लोकांच्या जीवनात सुधारणा करणं आहे. लोकांच्या जीवनात बदल करणं आहे, असं सिसोदीया म्हणाले.

दिल्लीच्या जनतेने आम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त प्रेम दिलंय. आमच्या कामाचा सन्मान करून त्यांनी तिसऱ्यांदा आम्हाला सत्तेत बसवलं आहे. पुढची 5 वर्ष आता झटून काम करायचं आहे, असंही ते म्हणाले.

दरम्यान. अरविंद केजरीवाल 16 फेब्रुवारी रोजी तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची थपथ घेतील. रामलीला मैदानावर केजरीवालांचा हा भव्य शपथविधी सोहळा पार पडणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

अरविंद केजरीवालांच्या शपथविधीची तारीख ठरली अन् मैदानही ठरलं!

-मराठवाड्याच्या पाणी योजनेवर ठाकरे सरकारचा मोठा निर्णय!

-दिल्लीत नेस्तनाबूत झालेल्या काँग्रेस नेत्यांना राजीनामा देण्याची घाई; मतभेद चव्हाट्यावर

-BSNLचा खासगी टेलिकॉम कंपन्यांना दणका; आता 96 रुपयात महिनाभर रोज मिळणार 10GB 4G डाटा

-दिल्लीत जंग-जंग पछाडून भाजप पराभूत; पाकिस्तानात काय प्रतिक्रिया??