खेळ

विराट कोहलीला इन्स्टाग्रामच्या एका पोस्टसाठी मिळणारी किंमत ऐकून थक्क व्हाल!

मुंबई : इन्स्टाग्राम सर्वाधिक वेगानं लोकप्रिय होणाऱ्या सोशल साईट्सपैकी एक साईट असून फोटो शेअरिंगसाठी ही साईट वापरली जाते. तरुण पिढीला इन्स्टाग्रामने चांगलीच भुरळ घातली असून आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण इन्स्टाग्रामवर शेअर करण्याचा अनेकांचा प्रयत्न असतो. यातून एक प्रकारचं मानसिक समाधान अनेकांना मिळतं, मात्र काही इन्स्टाग्राम युझर्सना मात्र अशा पोस्ट करण्यासाठी चक्क पैसे मिळतात. हजार किंवा लाखात नव्हे तर चक्क कोटींच्या घरात ही किंमत आहे असं सांगितलं तर कुणाला खरं वाटणार नाही, मात्र हे खरं आहे.

इन्स्टाग्रामवर सामान्य यूझर्सप्रमाणेच सेलेब्रेटी तसेच खेळाडू मोठ्या संख्येनं आहेत. अनेकजण आपापल्या आवडत्या सेलेब्रेटींना-खेळाडूंना फॉलो करतात आणि त्यांच्या प्रत्येक मोमेंटवर लक्ष ठेऊन असतात. अशांना त्यांच्या प्रत्येक पोस्टसाठी इन्स्टाग्राम पैसे देत असतं. अशा पोस्टच्या माध्यमातून त्यांचे चाहते इस्टाग्रामवर राहण्यास मदत होते, या साऱ्याचा मोबदला म्हणून हे पैसे सेलेब्रेटींना दिले जातात.

विराट कोहली एका पोस्टमागे किती पैसे कमावतो?-

वर सांगितल्याप्रमाणे इन्स्टाग्राम प्रत्येक सेलेब्रेटीला आपल्या प्रत्येक पोस्टसाठी विशिष्ट रक्कम देत असते. हॉपर एचक्यू या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, क्रीडा प्रकारात इंस्ट्राग्रामवर सर्वाधिक कमाई करण्याच्या टॉप 10 व्यक्तींमध्ये विराट एकमेव क्रिकेटर आहे. तसा तो या यादीत नवव्या स्थानावर आहे, मात्र त्याच्या पुढे सर्व फुटबॉलपटू आहेत. या यादीच्या पहिल्या क्रमांकावर पुर्तगालचा स्टार फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो आहे. रोनाल्डोनंतर ब्राझीलचा फुटबॉलपटू नेमारचा नंबर लागतो. तर या दोन दिग्गज फुटबॉलपटूनंतर अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सीचा क्रमांक लागतो.

सध्या इंस्टाग्रामवर विराटचे 38 मिलीयन म्हणजेच 3 कोटी 8 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहे. त्याने टाकलेल्या एका पोस्टला लाखो लाईक्स मिळत असतात. त्याआधारे त्याला एका इन्स्टाग्राम पोस्टमधून 1,96,000 डॉलर म्हणजेच सुमारे 1 कोटी 35 लाख रुपये मिळतात. अर्थात हा पैसा त्याला मिळणाऱ्या एका क्रिकेट सामन्याच्या मानधनाच्या २२ पट अधिक आहे. 

इन्स्टाग्रामवर सर्वाधिक पैसे मिळवणारे १० खेळाडू-

1.क्रिस्टियानो रोनाल्डो – फुटबॉल – 784000 पाउंड (6 कोटी 73 लाख)

2. नेमार – फुटबॉल – 580000 पाउंड (4 कोटी 98 लाख)

3. लियोनेल मेसी – फुटबॉल – 521000 पाउंड – (4 कोटी 47 लाख)

4. डेविड बैकहम – फुटबॉल – 287000 पाउंड (2 कोटी 46 लाख)

5. लेब्रोन जेम्स – बास्केटबॉल – 219000 पाउंड (1 कोटी 88 लाख)

6. रोनाल्डिनो – फुटबॉल – 206000 पाउंड (1 कोटी 76 लाख)

7. गैरेथ बेल – फुटबॉल – 175000 पाउंड (1 कोटी 50 लाख)

8. इब्राहिमोविच – फुटबॉल – 161000 पाउंड (1 कोटी 38 लाख)

9. विराट कोहली – क्रिकेट – 196000 पाउंड (1 कोटी 35 लाख)

10. लुईस सुआरेज – फुटबॉल – 148000 पाउंड (1 कोटी 27 लाख)

विराट कोहलीची ताजी इन्स्टाग्राम पोस्ट-

 

Instagram वर ही पोस्ट पहा

 

Positivity attracts positivity. Your choice defines your outcome. ???????? #BTS

रोजी Virat Kohli (@virat.kohli) ने सामायिक केलेली पोस्ट

महत्वाच्या बातम्या-

-मॉब लिंचिंगविरोधात 49 कलाकारांचं पंतप्रधानांना पत्र

-असला कसला विश्वविजेता?; आयर्लंडविरुद्ध इंग्लंडचा संघ अवघ्या 85 धावात गारद

-मराठा मोर्चाचं राजकारण करणाऱ्याला धडा शिकवू; निवडणूक लढण्यावरुन मोर्चात वाद

“एक दिवशी भाजपला कळेल प्रत्येक गोष्ट विकत घेता येत नाही”

IMPIMP