नाईट लाईफ म्हणजे नेमकं काय रे भाऊ?? जाणून घ्या या बातमीमधून!

मुंबई | नाईट लाईफ ही पाश्चिमात्य संस्कृती आहे. पाश्चिमात्य देशात रात्रीच्या वेळी मॉल्स, हॉटेल्स, पब, बार अशी ठिकाणं सुरू असतात. भारतात मात्र अशी ठिकाणं आत्तापर्यंत तरी सुरू नव्हती. भारतात मेट्रो सिटीतील लोकांकडून याची मागणी होत होती. लोकांना रात्रीच्या वेळी चित्रपट पाहता यावा, रेस्टॉरंटमध्ये रात्री कधीही जेवण करता यावं, उशिरापर्यंत बाहेर थांबता यावं, यासाठी ही मागणी होत होती. महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या एका निर्णयाने पुन्हा एकदा नाईट लाईफ हा मुद्दा यामुळेच चर्चेत आला आहे.

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचं मुंबईत नाईट लाईफ सुरू व्हावं, हे स्वप्न होतं. ते स्वप्न आता पूर्ण झालं आहे. कारण आज ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत मुंबईत प्रायोगिक तत्वावर नाईट लाईफ सुरू करण्याच्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळानं मंजूरी दिली आहे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी या निर्णयाची माहिती दिली आहे.

नाईट लाईफ सुरू झालं म्हणजे आता मुंबईतील लोकांना हॉटेल्स, दुकानं आणि मॉल्समध्ये रात्रभर कधीही जाता येईल आणि जिवाची मुंबई करता येईल.

दुसरीकडे नाईट लाईफमध्ये सध्या पब आणि बार नसेल. पब आणि बार रात्री दिड वाजेपर्यंतच सुरू राहतील. पब आणि बारसाठी महसूलचे निर्णय आहेत. त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असं सरकारने स्पष्ट केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-