रिया चक्रवर्ती आणि महेश भट्ट यांच्यातील नातं काय?; रिया सुशांतच्या मृत्युपुर्वीच म्हणालेली की…

मुंबई | बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्युप्रकरणी अनेक नवनविन खुलासे होत आहेत. सर्वोच्च न्यायालयानं हे प्रकरण आता सीबीआयच्या हाती सोपवलं आहे. यानुसार सीबीआयनं आपला तपास सुरु केला आहे. काही दिवसांपासून सुशांतची एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आणि दिग्दर्शक महेश भट्ट यांच्यातील व्हाट्सअॅप चॅट समोर आल्यानं महेश भट्ट आणि रियाच्या नात्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

महेश भट्ट आणि रियामधील नात काय याविषयी रियानं सुशांत मृत्युपूर्वीच सोशल मीडियावरून माहिती दिली होती. रिया आणि महेश यांच्यामध्ये बापलेकीचं नातं असल्याचं रियानं यापूर्वीच सांगितलं होतं.

2019 मध्ये महेश भट्ट यांच्या वाढदिवशी रियानं महेश भट्ट यांच्याबरोबरचे काही अनसीन फोटो शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. या पोस्टनंतर रिया खूप ट्रोल झाल्यानं तिनं ही पोस्ट डीलीट केली होती.

दरम्यान,  या ट्रोलिंगनंतर रियानं आणखी एक पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये रियानं पुन्हा महेश भट्ट यांच्याबरोबरचा फोटो शेअर करत ‘अमर प्रेम’मधील एका गाण्याच्या काही ओळी लिहिल्या होत्या. “तू कोण है, तेरा नाम है क्या? सीता भी यहाँ बदनाम हुई, असं कॅप्शन रियानं या पोस्टला दिलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

सुशांतच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये घोळ?; पाच डॉक्टर्स सीबीआय टीमच्या चौकशीच्या घेऱ्यात

“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रामाणिक व्हावं, ते खोटं बोलत नाही असा एकही दिवस नाही”

गणपतीच्या पाटाखाली भारताचे संविधान ठेवल्यामुळे ट्रोल झालेल्या तरडेंनी मागितली जाहीर माफी; म्हणाले…

आर्थिक क्षेत्रात भारताचा चीनला आणखी एक झटका; मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय

सुशांतच्या संपत्तीचा वारस कोण? सुशांतच्या वडिलांचा मोठा निर्णयशिवसेना 2014-19 दरम्यान भाजपसोबत असती तर…; फडणवीसांचा शिवसेनेवर निशाणा