महाराष्ट्र मुंबई

जनता कर्फ्यु’च्या दिवशी सर्वच रेल्वे बंद राहणार का?

railway 1

मुंबई | कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मार्चला म्हणजे  रविवारी ‘जनता कर्फ्यु’चं आवाहन केलं आहे. मात्र या दिवशी रेल्वेसेवा चालू राहणार आहे की नाही याबद्दल अजूनही नागरिकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत. यावर रेल्वेनं स्पष्टीकरण दिलं आहे.

मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल सेवा फक्त अंशत:च सुरू राहणार आहे. तर सर्व पॅसेंजर ट्रेन्स 24 तास बंद राहतील. एक्सप्रेस आणि मेल गाड्याही रद्द करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी प्रवासासाठी घराबाहेर न पडता घरातच राहावं असं आवाहन रेल्वेद्वारे करण्यात आलं आहे.

22 मार्च रोजी पूर्ण दिवस देशात 3 हजार 700 ट्रेन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेनं यासंबंधी परिपत्रकही काढलं आहे. तसंच मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि सिकंदराबाद येथील उपनगरीय रेल्वेच्याही किमान फेऱ्याच सोडण्यात येणार असल्याचंही रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, राजकीय अस्थिरता असलेल्या मध्यप्रदेशातही आता कोरोनाने शिरकाव केलाय. जबलपूरमध्ये विदेशातून आलेल्या 4 जणांना कोरोना असल्याचं स्पष्ट झालंय. यातले 3 जण हे एकाच कुटुंबातले आहेत. सर्वांना सुभाषचंद्र बोस हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

 

महत्वाच्या बातम्या – 

-महाराष्ट्रातील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 52 वरुन 63 वर

-म्हणुन… अ‍ॅपलचे आयफोन्स एकापेक्षा जास्त खरेदी करता येणार नाहीत

-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील पेट्रोलपंप आजपासून राहणार अर्धावेळ बंद

-अमेरिका ते भारत… ‘होम क्वारंटाईन’चा शिक्का असलेल्या अमेय वाघचा चित्तथरारक अनुभव

-“ही लढाई देशाची लढाई आहे हे विरोधी पक्षाने कधी समजून घेतलंच नाही.”