महाराष्ट्र मुंबई

‘व्हॅलेंटाईन डे’ चा प्लॅन काय विचारताच आदित्य ठाकरे लाजले; म्हणतात…

मुंबई | 14 फेब्रुवारी हा दिवस संपूर्ण जगभरात व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो. आज तरूण तरूणी आपल्या आवडत्या व्यक्तीला आपल्या मनातील भावना बोलून दाखवत असतात. तसंच त्यांना सरप्राईज देखील देतात. महाराष्ट्राचे तरूण मंत्री आदित्य ठाकरे यांना व्हॅलेंटाईनचा प्लॅन विचारसा असता ते या प्रश्नावर भलतेच लाजले.

जगभरात व्हॅलेंटाईन डे साजरा होतोय… तुमचा आजचा काय प्लॅऩ आहे? असा प्रश्न एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने आदित्य ठाकरे यांना विचारला. त्यांनी या प्रश्नाला बगल देत आपण महाराष्ट्राच्या पर्यावरण, शिक्षण क्रीडा या विषयावर बोलूयात… असं म्हटलं.

आदित्य ठाकरे व्हॅलेटाईन प्लॅनवर बोलते होत नव्हते म्हणून प्रतिनिधीने त्यांची फिरती घेत तुमच्या पर्यावरण, शिक्षण खेळ या प्रोजेक्टमधूनच पुढच्या पर्यटनाला, पर्यावरणाला ‘दिशा’ मिळणार आहे… असं म्हटलं. त्यावर, त्यांची आणि तुमची मी भेट करून देतो, असं आदित्य ठाकरे लाजत म्हणाले.

दरम्यान, गेली अनेक महिने आदित्य ठाकरे आणि अभिनेत्री दिशा पटानी यांच्या अफेयर्सच्या चर्चा मोठ्या खुबीने रंगत आहेत. संगमनेरच्या मुलाखतीत देखील अवधूत गुप्ते यांनी आदित्य ठाकरे यांना हाच प्रश्न विचारला होता. त्यांच्या यॉर्करवर आदित्य यांनी जोरदार षटकार लगावला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

-औरंगाबादचं नाव ‘संभाजीनगर’ करून मुख्यमंत्री सरप्राईज देणार; चंद्रकांत खैरेंचं मोठं वक्तव्य

-इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करा; अंद्धश्रद्धा निर्मुलन समितीची मागणी

-खरे चाणक्य कोण शरद पवार की तुम्ही??; अमित शहांनी दिलेलं उत्तर तुफान व्हायरल

-भारत भेटीला येणाऱ्या ट्रम्पंना झोपडपट्टी दिसू नये म्हणून उभी राहणार भिंत

-“पवारांवर पीएचडी करणं ये आपके बस का काम नही है”