भोपाळ| काँग्रेस मधील 18 वर्षाचा प्रवास संपवून भाजपच्या वाटेवर निघालेल्या ज्याेतिरादित्य शिंदेयांना भाजपमध्ये काय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मध्यप्रदेशात सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्रिपद न मिळाल्यानं नाराज झालेले ज्योतिरादित्य शिंदे गेल्या अनेक महिन्यांपासून अस्वस्थ होते. अखेर आपल्या वडिलांच्या जयंतीच्या दिवशीच त्यांनी वेगळी वाट चोखाळण्याचा निर्णय घेतला. सकाळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आणि त्यानंतर लगेच आपला राजीनामा टि्वटरवर पोस्ट केला. खरं तर हा राजीनामा त्यांना सोमवारीच टाईप करून ठेवलेला होता. तो मंगळवारी प्रसिद्ध केला.
ज्याेतिरादित्य सिंधियांना भाजपमध्ये काय भेटू शकतं हे आपण पाहू-
1. राज्यसभेत प्रवेश होताच, मध्य प्रदेशातील बंडाबद्दल बक्षिसी म्हणून केंद्रात मंत्रिपद मिळू शकतं.
2. शिवाय सिंधिया यांच्याकडे मध्य प्रदेश भाजपाचं प्रदेशाध्यक्षपदही येऊ शकतं. पण, त्यासाठी भाजपाला अंतर्गत कुरबुरीचा सामना करावा लागेल.
3. सिंधिया यांच्यासोबत भाजपात येणाऱ्या आमदारांना पुन्हा निवडणुकीत तिकीट आणि जिंकल्यास मंत्रिपद अशी बक्षिसी मिळू शकते.
4.ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते. त्यातून त्यांना राज्यसभेत प्रवेश मिळेल.
5. हे दोन्ही मिळालं नाही तर त्यांना मध्य प्रदेशातच मुख्यमंत्री बनवण्यावर विचार केला जाऊ शकतो. पण, त्यांच्यासमोर शिवराजसिंह चौहान यांचं आव्हान असेल.
महत्वाच्या बातम्या-
-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या कार्यक्रमापूर्वी औषध फवारणी
-कोरोनाबाबत असहकार्य करणाऱ्यांची गय केली जाणार नाही- छगन भुजबळ
-ज्योतिरादित्य शिंदे वेगळा पक्ष काढणार; पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
-कोरोनामुळं मुकेश अंबानींनी श्रीमंतांच्या यादीतील अव्वल स्थान गमावलं
-काँग्रेसला मोठा झटका! ज्योतिरादित्य शिंदे यांचा काँग्रेस पक्षाला रामराम