Top news कोरोना देश

कोरोना पॉझिटिव्ह असल्यास कोणते पदार्थ खावे? याबद्दल केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी दिला ‘हा’ सल्ला

Photo Credit- facebook/@drharshvardhanofficial

नवी दिल्ली |  गेल्या वर्षाभरापासून कोरोना संसर्ग रोगाने थैमान घातला आहे. काही दिवसांपूर्वी कोरोना रोगाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याचं पाहायला मिळालं होतं. पंरतू फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा कोरोना रोगाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने नागरिकांसाठी काही निर्बंधही घालून दिले आहेत. त्यामध्ये मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे यांसारख्या नियांमाचा समावेश आहे. पंरतू तरीही कोरोना आटोक्यात येत नसल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसतं आहे.

ढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पुन्हा एकदा आरोग्य सेवेवर ताण आला आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे बेड आणि त्याचबरोबर ऑक्सिजन सिलेंडचीही मागणी वाढू लागली आहे.याचदरम्यान सोशल मीडियावर सध्या कोरोना संसर्गापासू कसा बचाव करायचा, कशा प्रकारे काळजी घ्यायची या सर्व गोष्टींचे घरगुती उपया सांगण्यात येत आहे.

अशातच कोरोना टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर कोणते पदार्थ खायचे याबद्दल अनेकांना प्रश्न पडलेला असतो. तर केंद्रीय मंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी डार्क चॉकलेट खाण्याचा सल्ला दिला आहे.

डार्क चॉकलेटमध्ये 70 टक्के कोको कंटेन्ट असतं. त्यामुळे कोरोनाच्या स्ट्रेसवर मात करता येते, म्हणून डार्क चॉकलेट खा यासंदर्भात त्यांनी ट्विटही केलं आहे.

डॉ. हर्षवर्धन यांनी डार्क चॉकलेटसह अन्य पदार्थांची यादीही दिली असून त्यातून इम्युनिटी पॉवर वाढत असून स्ट्रेसही कमी होत असल्याचं म्हटलं आहे. त्यात त्यांनी प्रोटीनसाठी चिकन, मासे, अंडी, पनीर, सोयाबिन आणि नट्स यासोबतच हळदीयुक्त दूध या पदार्थांचे सेवन करण्याचा सल्ला दिला आहे.

त्याचप्रमाणे सर्वांनी नियमित व्यायाम, प्राणायाम केला पाहिजे असा सल्लाही केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या- 

रेल्वे स्थानकावरचा महिला पोलिसांचा भन्नाट डान्स होतोय सोशल…

कोरोनापासून वाचण्यासाठी महिलेनं शोधून काढला भयंकर उपाय,…

पूलावर गाडी थांबवत महिलेनं असं काही केलं की पोलिसांनी केली…

चौघांबरोबर पाचव्यालाही गाडीवर बसवण्यासाठी लढवली अनोखी शक्कल,…

धक्कादायक! संत्र्याच्या बागेत रुग्णांवर उपचार करत सलाईनमधून…

IMPIMP