कोरोनापासून वाचण्यासाठी काय खावं, काय खाऊ नये?, वाचा अत्यंत महत्त्वाची माहिती

मुंबई | भारतात पुन्हा एकदा कोरोना विषाणूचे रुग्ण वाढू लागले आहेत. कोरोनाच्या ‘ओमिक्रॉन’ या नवीन प्रकारामुळे दररोज रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. यासोबतच कोरोनाच्या ‘ओमिक्रॉन’ व्हेरिएंटची (Omicron Variant) 161 नवीन प्रकरणं समोर आल्यानंतर ओमिक्रॉनबाधित एकूण रुग्णांची संख्या 1431 वर पोहोचली आहे.

कोरोनाचं नवं रुप जास्त खतरनाक असून थोडीशी चुकीही महागात पडून कोरोना होण्याची शक्यता असते. वारंवार हात धुत राहणं, मास्क लावणं यासोबतच खाण्यापिण्याच्या गोष्टींकडेही लक्ष देण्याची गरज आहे.

या काळात आपण असं जेवण घेतलं पाहिजे की जे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवेल आणि गंभीर आजारांपासून आपल्याला वाचवेल. आहारासंदर्भात काही महत्त्वाच्या सूचना, ज्यामुळे आपला कोरोनापासून बचाव होऊ शकतो.

एकमेकांच्या संपर्कात आल्याने कोरोना होण्याचा धोका जास्त आहे. त्यामुळे बाहेर जाऊन जेवण करणं टाळा. सध्या कोरोनाचा प्रभाव वाढत असल्यानं हॉटेल तसेच रेस्टॉरंटमध्ये जाऊन जेवायला अनेक भागांमध्ये बंदी आहे. मात्र घरी पार्सल मागवायची सुविधा सुरु आहे, त्यामुळे आपल्या आहारावर लक्ष न देता फास्ट फूड तसेच इतर पदार्थ बाहेरुन मागवायचं प्रमाण वाढलं आहे, मात्र रोजरोज बाहेरचं खाणं चांगलं नाही. सकस आहार न मिळाल्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती बिघडू शकते, त्यामुळे या कठीण काळात घरचंच खाणं पसंत करा.

लठ्ठपणा, हृदयरोग, डायबिटीज तसेच कॅन्सरसारख्या भयंकर आजारांपासून दूर राहण्यासाठी साखर, फॅट्स असलेल्या गोष्टी तसेच जास्त प्रमाणात मीठ खाणं बंद करा. चहा तसेच कॉफीतून तुमच्या पोटात जाणारी साखर देखील तुमच्यासाठी काळजीचं कारण बनू शकते.

आपल्या शरीरासाठी पाणी हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. रक्तासाठी तसेच शरीराचं तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. याशिवाय शरीरातील विषारी गोष्टी बाहेर फेकण्याचं महत्त्वाचं काम देखील पाणीच करतं. त्यामुळे प्रत्येकानं प्रत्येक दिवशी कमीत कमी 8 ते 10 ग्लास पाणी प्यायला हवं.

पाण्याशिवाय इतर काही गोष्टी देखील शरीरातील पाण्याचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करत असतात. यामध्ये पाण्याशिवाय आपण फळांचा ज्यूस सुद्धा घेऊ शकतो. याशिवाय लिंबू पाणी घेतल्यास उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्याला आणखी फायदा होऊ शकतो.

महत्वाच्या बातम्या-

Omicron पासून वाचण्यासाठी असा करा स्वत:चा बचाव; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला 

पुढील 24 तास महत्त्वाचे; राज्यातील काही भागात पावसाची शक्यता 

‘या’ महिन्यात भारतात दररोज 2 लाख रूग्ण आढळतील, तज्ज्ञांच्या दाव्याने खळबळ 

“…त्यावेळी मला अनेकांनी वेड्यात काढलं”; द डर्टी पिक्चरबाबत विद्या बालनचा खुलासा 

 “नवीन वर्षात महाविकास आघाडी सरकार घालवण्याचा संकल्प केलाय”