नवी दिल्ली | देशातील दूरसंचार कंपन्यांच्या सातत्याने येत असलेल्या तक्रारीवर व्हॉट्सअॅप (WhatsApp) कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे. व्हॉट्सअॅप आणि फेसबुकवर (Facebook) मोफत कॉलमुळे त्यांंच्या व्यापारावर परिणाम होत आहे.
त्यामुळे आता देशात लवकरच अशी प्रणाली लागू करण्यात येणार आहे, ज्यामुळे व्हॉट्सअॅप कॉल करण्यासाठी पैसे आकारण्यात येणार आहेत. याकरिता आता जनतेची मते जाणून घेण्यात येणार आहेत.
व्हॉट्सअॅप आणि फेसबुकच्या माध्यमातून कॉल आणि मॅसेज करणे या सुविधा दूरसंचार (Communication) म्हणून मानल्या जाणार आहेत. तश्या प्रकारची तरदूद आता करण्यात येणार आहे. (WhatsApp and Facebook calls will be chargeable)
देशीतल सर्व दूरसंचार कंपन्या सातत्याने तक्रारी करत होत्या की, व्हॉट्सअॅप आणि फेसबुकमुळे त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे आगामी काळात हा निर्णय घेण्यात येणार असल्याचे म्हंटले जात आहे.
त्याकरिता जनतेची मते जाणून घेण्यासाठी विधेयकाचा कच्चा मसुजा तयार करण्यात आला आहे. या व्हॉट्सअॅप फेसबुकवरुन केल्या जाणाऱ्या कॉलचा समावेश दूरसंचारमध्ये व्हावा, अशी मागणी केली गेली आहे.
20 ऑक्टोबरपर्यंत यावर जनतेला आपली मते नोंदविता येणार आहेत. विधेयकांतील तरतुदीबाबत लोक आपली मते आणि सूचना मांडू शकतात. जनतेचा कौल मिळाल्यानंतर हे विधेयक लोकसभेत मांडण्यात येणार आहे.
या कायद्यामुळे सायबर फसवणुकींवर (Cyber Crime) देखील आळा बसणार आहे. दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव (Communication Minister Ashwini Vaishnaw) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या मते, या कायद्याने सायबर गुन्ह्यांच्या शिक्षेत वाढ करण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मेळावा; राज ठाकरे म्हणाले, मैदानाचा वारसा…
अमित शहांची लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमारांवर मोठी टीका; म्हणाले, लालूजींनी आयुष्यभर…
न्यायालयाने फटकारल्यावर शिंदे यांच्या गटाकडून पहिली प्रतिक्रिया; दादा भुसे म्हणाले…
नवनीत राणांना लवकरच अटक होणार, न्यायालयाने बजावले अजामीनपात्र वॉरंट