टेन्शन संपलं! WhatsApp वापरकर्त्यांना लवकरच मिळणार ‘ही’ खास सुविधा

नवी दिल्ली | सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया संसाधन म्हणून व्हाॅट्सअॅपला ओळखण्यात येतं. कंपनी आपल्या खास फिचरच्या माध्यमातून व्हाॅट्सअॅपची लोकप्रियता वाढवण्याचा विचार करत आहे.

व्हाॅट्सअॅप फिचरमध्ये सध्या अनेक त्रुटी सांगितल्या जात आहेत. अशात आपण केलेला मॅसेज दोन्हीकडील बाजूंना दिसू नये म्हणून तो आपण डिलीट करतो. पण तो एका विशिष्ट वेळेनंतर फक्त एकाच बाजूकडून मॅसेज डिलीट होतो.

व्हॉट्सअॅप आपल्या वापरकर्त्यांना आकर्षित करण्यासाठी नवीन अपडेटवर काम करत आहे, ज्यानंतर तुम्ही दोन दिवसांनंतरही संदेश हटवू शकाल. व्हॉट्सअॅप ‘डिलीट फॉर एव्हरीवन’ वैशिष्ट्याची वेळ मर्यादा सध्या एक तास, आठ मिनिटे आणि 16 सेकंद इतकी आहे.

सध्या असलेल्या मर्यादेत वाढ करून ती दोन दिवस आणि 12 तासांवर वाढविण्यावर काम करत आहे. याचा फायदा असा होईल की जर तुम्ही एखाद्याला चुकीचा मेसेज पाठवला असेल तर दोन दिवसांनी तुम्ही तो डिलीट करू शकाल.

सदरील बदल व्हॉट्सअॅप बीटा आवृत्ती 2.22.410 वर दिसला आहे आणि नंतर अॅपच्या स्थिर आवृत्तीमध्ये येऊ शकतो. हे वैशिष्ट्य अद्याप उपलब्ध नसले तरी, बीटा टेस्टर्ससाठी देखील वेळेची मर्यादा बदलण्याची ही पहिलीच वेळ नाही, व्हॉट्सअॅपनेही मेसेज डिलीट करण्याची मुदत बदलली आहे.

वापरकर्त्यांना संदेश कायमचा हटवण्यासाठी अडीच दिवस मिळतील. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये व्हॉट्सअॅपने आपली मुदत सात दिवसांनी वाढवण्याचा विचार केला होता. पण अद्यापी त्यावर कसलाही निर्णय होवू शकला नाही.

सात दिवसांपेक्षा जास्त काळ करणे ही चांगली कल्पना नाही, कारण लोकांना त्यांनी आठवड्यापूर्वी पाठवलेला संदेश हटवायचा नाही. सध्या या फिचरच्या अंमलबजावणीवर अनेक मतमतांतर आहेत.

दरम्यान, व्हाॅट्सअॅपमध्ये अनेक बाबतीत बदलांची गरज सध्या वापरकर्त्यांमार्फत कंपनी जाणून घेत आहे. अशातच कंपनी आपल्या वापरकर्त्यांना चांगल्या सुविधा पुरवण्यावर भर देत आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 शर्यतीदरम्यान बैलगाडी थेट लोकांच्या गराड्यात घुसली अन्…; पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ

 धक्कादायक! लसीकरणानंतर वैद्यकीय शाखेतील विद्यार्थिनीचा मृत्यू

आता सुट्टी नाय, होत्याचं नव्हतं करीन पण…- किरण माने

 मोठी बातमी! दहावी आणि बारावीच्या परीक्षेसंदर्भात महत्वाची माहिती समोर

“वाईन दारू नसेल तर मरणाऱ्या आईला ती गंगाजळऐवजी पाजाल का?”