अंतिम वर्षाच्या परीक्षा केव्हा आणि कशा पद्धतीने होणार?; राज्य सरकारने केलं जाहीर!

मुंबई | गेले कित्येक दिवस महाविद्यालयाच्या अंतिम विद्यार्थांच्या परीक्षा होणार की नाही, हा प्रश्व होता. मात्र सर्वोच्च न्यायलायने यावर आपला निर्णय देत परीक्षा होणार असल्याचं सांगितलं. त्यानंतर मात्र परीक्षा कधी होणार?, त्या कशा पद्धतीने होणार, असे अनेक प्रश्व होते. मात्र यावर उच्च आणि तज्ञशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं आहे.

अंतिम वर्षाची परीक्षा ही ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात घेतल्या जाणार असून परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घरी बसूनच देता येणार असल्याचा विचार असल्याचं सामंत यांनी सांगितलं आहे. मुंबईमध्ये आयोजित पत्रकार परिषदेच ते बोलत होते.

सर्व विद्यापीठातील 7 लाख 92 हजार 385 विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यायची आहे. विद्यापीठांनी शासनाला विनंती केली आहे. यूजीसीकडे 31 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ मागावी. काही विद्यापीठांनी 10 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ मागावी अशी विनंती केली असल्याचंही सामंत यांनी सांगितलं.

राज्यातील अनेक कुलगुरूंनी अशी मागणी केली असून ही मागणी मान्य करण्यासाठी सर्वांनी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक व्हावी आणि मुदतवाढीचा प्रस्ताव ठेवावा आणि तशी विनंती यूजीसीकडे करावी अशी सूचना करण्यात आली असल्याचंही सामंत यांनी म्हटलं आहे.

कुलगुरु आणि समितीच्या लोकांनी बैठक आणि चर्चेसाठी अजून एक दिवस देण्याची विनंती केली आहे. परीक्षा कशी पद्धतीने घ्याव्या लागतील यासाठी बुधवारी दुपारी चार वाजता बैठक होणार आहे. त्यानंतर सरकारकडे दुसरा प्रस्ताव सादर केला जाणार असल्याची माहितीही सामंत यांनी दिली आहे.

काही विद्यापीठे ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत निकाल लावतील. विद्यार्थींना घराबाहेर पडून परीक्षा द्यावी लागणार नाही. परीक्षा कशा पद्धतीने, कोणत्या सोप्या पद्धतीने घ्यायच्या याबाबत समिती परवा आपला प्रस्ताव सादर करणार असल्याचं सामंत यांनी सांगितलं.

दरम्यान, विद्यार्थी घरीच सुरक्षित कशी परीक्षा देऊ शकतील याबाबत आम्ही विचार करतोय. ऑफलाईन, एमसीक्यू, ओएमआर, ओपन बुक, असाईनमेन्ट बेस असे पर्याय आहेत. ज्या द्वारे घरी बसून विद्यार्थी परीक्षा देऊ शकतील, असं राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

इतर राज्याची सुरक्षा हवी असेल तर आपलं चंबू गबाळ आवरावं, हा काय तमाशा चाललाय- संजय राऊत

…तर सुशांत सिंह राजपूतचं प्रकरण विरोधकांच्या अंगलट येईल- रावसाहेब दानवे

काँग्रेसनंतर आता भाजपमधील पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर!

“मंदिरं उघडण्याच्या प्रश्नी घंटानाद आंदोलन करत विरोधकांनी सोशल डिस्टन्सिंगची काशी केली”

‘राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराचा जातीय दाखला बोगस’, शिवसेना नेत्याचा आरोप