“आम्ही मराठ्यांच्या पोटचे नाही का?, आम्हाला आमच्या जातीचा अभिमान नाही का?”

पुणे | छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज संपुर्ण महाराष्ट्रात साजरी केली जात आहे. शिवजयंती निमित्त आज वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत.

आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर शासकिय शिवजयंती साजरी केली जात आहे. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर मंत्रीगण उपस्थित होते.

या कार्यक्रमात भाषण देताना एका व्यक्तीने मध्येच मराठा आरक्षणावरून अजित पवारांना प्रश्न विचारला. त्यावेळी अजित पवारांनी संतप्त उत्तर दिल्याचं पहायला मिळालं.

मी, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील आम्ही काही मराठ्यांच्या पोटचे नाहीत का?, असा सवाल त्यांनी यावेळी विचारला आहे.

आम्हाला आमच्या जातीचा अभिमान नाही का?, असंही अजित पवार भर कार्यक्रमात म्हटले. आज शिवजयंती आहे, असलं चालणार नाही, असं म्हणत अजित पवारांनी भर सभेत विचारणा करणाऱ्याचे कान टोचले.

शिवाजी महाराजांनी आपल्याला काय शिकवलं?, सर्वांना सोबत घेऊन जायचं. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, ही राज्य सरकारची कायम भूमिका असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

या मुद्द्यावर मार्ग काढण्याचा आमचे सर्व प्रयत्न आहेत. इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत, असंही अजित पवार यावेळी म्हणाले आहेत.

राज्य शासनाकडून किल्ल्यांचा विकास करण्यात येत आहे.  कोणत्याही मुळ रचनेला धक्का न लावता हा वारसा जतन करण्यात येईल, असंही अजित पवार यावेळी म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

ठरलं तर! भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदी ‘या’ दिग्गज खेळाडूची वर्णी

‘कुणाची सुपारी घेऊन आलाय का?’; भर कार्यक्रमात प्रश्न विचारणाऱ्या तरूणावर अजित पवार भडकले 

काय सांगता! दारू आणि तंबाखू सेवनात महिला अव्वल, धक्कादायक आकडेवारी समोर 

 “सासू बनून त्रास द्याल तर सुनेचेही दिवस येतील”

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वात उंच पुतळ्याचं औरंगाबादेत आदित्य ठाकरेंच्या हस्ते अनावरण!