नवी दिल्ली | कोरोना महामारीनं गेल्या दोन वर्षापासून थैमान घातलं आहे. कोरोनाच्या तिन्ही लाटांनी नागरिकांमध्ये चांगलीच धास्ती भरवलीये. कोरोनामुळे सगळेच चिंतेत आहेत.
कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. लसीकरणामुळे काही अंशी कोरोनाचा नवनवीन व्हेरियंट आटोक्यात येत आहे. मात्र लसीकरणामुळे मृत्यूच्या धोका कमी होतोय.
ज्या लोकांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत अशांना कोरोनाचा तिसरा डोस म्हणजेच बूस्टर डोस घेण्यास परवाणगी दिली आहे. त्यामुळे आता बुस्टर डोसही घेण्याचा निर्णय प्रशासनानं दिला आहे.
कोरोनातून बरे झालेल्या व्यक्तींनी कधी बूस्टर डोस घ्यावा यााविषयी आरोग्य विभागाचे सचिव विकास शील यांनी महत्त्वाची माहिती आहे.
विकास शील यांनी म्हटलं की, कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींनाच बूस्टर डोस घेता येऊ शकतो. ‘लॅब चाचणीत लोकांना SARS-2 Covid-19 ची लागण झाल्याचे आढळल्यास त्यांना तीन महिन्यानंतर लसीचे डोस दिले जातील. याविषयी त्यांनी राज्यांना पत्र लिहिले आहेत.
दरम्यान, कोरोनाचा उद्रेक होताना दिसत आहे. दिवसागणिक संसर्ग वाढत चालला असून रुग्णसंख्येत वाढ होत आहे. संसर्ग असाच वाढत राहिल्यानं देशाला तिसऱ्या लाटेला सामोरं जावं लागत आहे.
कोरोना काळात लसीकरण हे महत्वाचं शस्त्र असून सध्या सरकारकडून त्यावर भर दिलेला पाहायला मिळत आहे. अशातच बूस्टर डोस घेण्यासाठी नागरिकांना आवाहन केलं जात आहे.
लसीकरणामुळे बऱ्याच अंशी कोरोना आटोक्यात येत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लसीकरण मोहिम राबवली आहे. प्रत्येक नागरिकाचं लसीकरण पूर्ण व्हावं यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
अभिनेत्री समंथानं डिलीट केली घटस्फोटाची पोस्ट, पुन्हा चर्चांना उधाण
“राज्यातील सरकार बरखास्त करण्यापेक्षा केंद्र सरकार बरखास्त करा”
“बाळासाहेब असते तर विरोधकांची कावकाव, चिवचिव, फडफड, तडफड थंड पडली असती”
”आम्हाला बाळासाहेब भेटल्यासारखे वाटेल, आमचा भाऊ आम्हाला भेटणार”