4 वर्षाचा असताना आई गेली अन् वडिलांनी…., अशा प्रकारे बनला क्रिकेटर, वाचा संघर्षमय प्रवास

मुंबई| भारताचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉ ने पहिल्याच आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यात शतकी खेळी करत सर्वच क्रिकेट रसिकांची वाहवा मिळवली होती. नुकत्याच झालेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याने धावांचा डोंगर करत मुंबई संघाला विजेतेपद मिळवून दिले होते. या सामन्यात नवखा कर्णधार रिषभ पंतच्या दिल्ली संघाने चेन्नईचा सहज पराभव केला. या सामन्याचा हिरो ठरला दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉ.

पृथ्वी शॉ च्या या देदीप्यमान यशामागे त्याची अनेक वर्षांची मेहनत आहे. मूळचा बिहारचा असलेला पृथ्वी शॉ च्या क्रिकेटर बनण्यामध्ये त्याच्या वडिलांचाही मोठा संघर्ष आहे.

18व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा पृथ्वी मुळचा मुंबईचा रहिवासी आहे. सामान्य कुटूंबात जन्मलेला पृथ्वी शॉ चा जन्म 9 नोव्हेंबर 1999 मुंबईमधील विहार येथे झाला. पृथ्वी फक्त चार वर्षाचा असताना त्याची आई हे जग सोडून गेली. त्यामुळे पृथ्वीला आईचे प्रेम जास्त काळ लाभले नाही.

पृथ्वीचे वडील पंकज शॉ हे मूळचे बिहारमधील गया जिल्ह्यातील मानपूर गावचे रहिवाशी आहेत. मुंबईत ते कामाच्या निमित्ताने आले आणि इथेच स्थायिक झाले. त्याच्या वडिलांचे कपड्याचं दुकान होतं. मात्र पृथ्वाच्या आईचं निधन झाल्यानंतर त्यांनी ते बंद केलं. आईच्या पश्चात वडील पंकज शॉ यांनी त्याला कधीच कोणतीच उणीव भासू दिली नाही.

मुलावर मेहनत घेत असताना घरात सारं काही आलबेल मुळीच नव्हतं. पंकज शॉ यांचा व्यापार डबघाईला आला होता. त्यांची आर्थिक परिस्थिती प्रचंड खालावली होती. पण घरावर येणाऱ्या आर्थिक संकटांची झळ त्यांनी पृथ्वीपर्यंत कधीच पोहचू दिली नाही.

पृथ्वीला पहिल्यापासून क्रिकेट खेळण्यात रस होता. वडिलांनी त्याची आवड ओळखून त्या दिशेने पृथ्वीला वाटचाल करायला मदत केली. पृथ्वी लहान असतानाच वडिलांनी त्याला क्रिकेट अकॅडमी मध्ये टाकलं. परिस्थिती नसल्याने क्रिकेटचे धडे घेण्यास अडचणी येत होत्या. पण एका एंटरटेनमेंट कंपनीने त्याला आर्थिक मदत केली. विविध देशांमध्ये विविध स्पर्धांमध्ये भाग घेतला.

पृथ्वीचे वडिल रोज पहाटे त्याला पृथ्वीला उठवायचे. त्याला क्रिकेटच्या सरावासाठी घेऊन जायचे. दिवसभर सावलीसारखे पृथ्वीच्या सोबत राहायचे. त्याच्या चुका त्याला निक्षून सांगायचे. जेव्हा सरावासाठी सोबत कोणीच नसेल तेव्हा ते स्वत: हातात चेंडू घेऊन गोलंदाजी करायचे. या परिश्रमांमुळेच पृथ्वीमध्ये लपलेला खेळाडू घडत गेला.

पृथ्वी सर्वप्रथम चर्चेत आला 2013 मध्ये जेव्हा त्याने शालेय क्रिकेटमध्ये धावांचे डोंगर उभारले. त्याने एका सामन्यात तर 330 चेंडूत 546 धावा चोपल्या होत्या. त्यानंतर त्याची विजय मर्चेंट चषकासाठी अंडर 16 संघात निवड झाली.

पृथ्वीची सर्वप्रथम मुंबईच्या रणजी संघात निवड 2017 मध्ये झाली. त्याने तामिळनाडू विरुद्ध पहिला सामना खेळला. पहिल्याच सामन्यात दुसऱ्या पारीत त्यानं शतक झळकावून मुंबईला विजय मिळवून दिला. त्याने हे शतक करत सचिनचा रेकॉर्ड मोडला. तो पहिल्याच सामन्यात शतक झळकावणारा सर्वात तरुण खेळाडू बनला. पहिल्याच सामन्यात त्याला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देखील मिळाला.

भारताच्या अंडर 19 संघात विश्वचषकासाठी स्थान मिळालं. अंडर 19 संघाचं कर्णधारपद देखील मिळालं. त्याच्या नेतृत्वात भारताने 2018 मध्ये अंडर 19 विश्वचषक देखील जिंकला. त्याने फायनलमध्ये देखील शतक झळकावलं होतं. 2018 मध्ये पृथ्वीला दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने 1.2 कोटी रुपयात खरेदी केले.

दरम्यान, आयपीएलचं चौदावं सीजन नुकतंच सुरु झालं आहे. या सिजनमध्ये पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात झाला तर दुसरा सामना काल दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपरकिंग्स या संघात झाला. या सामन्यात नवखा कर्णधार रिषभ पंतच्या दिल्ली संघाने चेन्नईचा सहज पराभव केला. या सामन्याचा हिरो ठरला दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉ.

महत्वाच्या बातम्या – 

मास्क नाही घातलं म्हणून पोलिसांनी जोडप्याला आडवलं तर बाई…

कौतुकास्पद! तहानलेल्या माकडाची अशापद्धतीने तहान भागवली, पाहा…

IPL 2021: दिल्लीचा पंजाबवर 6 विकेट्सनं दमदार विजय, पाॅईंट…

IPL 2021: यंदाची आयपीएल विराट जिंकणार??? आरसीबीच्या विजयाची…

‘मीदेखील खूप काही बोलू शकतो पण…..’ अनुषा…