धक्कादायक! कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याने एसटी कर्मचाऱ्याने उचललं ‘हे’ मोठं पाऊल!

सांगली | सध्या कोरोनानं जगभर थैमान घातलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे कित्येक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. कोरोना महामारीमुळे उपासमारीचे संकट ओढावल्याने राहत्या घरात गळफास घेऊन एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सांगलीमध्ये घडली आहे.

अमोल माळी (वय 35) हे इस्लामपूर आगारमध्ये मेकॅनिकल म्हणून काम पाहत होते. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून ते घरी बसून आहेत. दोन महिने पगार न झाल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती. यामुळे अमोल यांनी आपल्या राहत्या घरामध्ये साडीने गळफास घेत आत्महत्या केली आहे.

अमोल माळी यांच्या कुटुंबामध्ये ते एकटेच कमवणारे होते. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर होती. एसटी आगारचे काम नसल्याने ते आणि त्यांची पत्नी इतर ठिकाणी काम करून घर चालवत होते. मात्र, गेल्या 2 महिन्यांपासून ते आर्थिक अडचणींमुळे तनावामध्ये होते. या तनावातून अमोल यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं आहे.

अमोल यांच्या पश्चात त्यांची आई, पत्नी, 5 वर्षांचा मुलगा आणि 2 वर्षांची मुलगी असा परिवार आहे. पोलिसांनी याप्रकरणी अपमृत्यूची नोंद केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

भाजपला झाली लगीनघाई पण जोडीदारीण मिळेना, उद्यापासून लॉकडाऊन तोडा- प्रकाश आंबेडकर

कोरोनाच्या कृपेने 33 वर्ष परीक्षा देणारा विद्यार्थी अखेर झाला मॅट्रीक पास!

‘कोहलीला अटक करा’; उच्च न्यायालयात याचिका दाखल

महाविकास आघाडी सरकार म्हणजे एक कुटूंब नसून ते लिव्ह इन रिलेशनशिप- देवेंद्र फडणवीस

मैत्रीच्या नात्याला काळिमा! दारू पिताना झालेल्या वादात मित्रानेच केला मित्राचा खून