मुंबई | गेल्या वर्षी कोरोनाने जगभरात थैमान घातलं होतं. सध्या देशात कोरोना स्थिती नियंत्रणात आली असल्याने समाधानकारक चित्र आहे. कोरोनावर एकमेव उपाय असलेल्या लसीकरणाही वेगाने सुरू असल्याने काहीसं दिलासादायक चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
सध्या देशात 100 कोटी नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं आहे. काहीजणांचा पहिला डोस पुर्ण झाला आहे. तर काहींचा दुसरा डोसही पुर्ण झाला आहे. त्यामुळे आता कोरोना रूग्णसंख्या आता भरपूर प्रमाणात कमी झाल्याचं दिसतंय.
कोरोना लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही कोरोनाची भीती पुन्हा उद्भवू नये यासाठी नागरिकांना बुस्टर डोस देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, हा बुस्टर डोस नेमका कधी घ्यायचा याबद्दल काही माहिती समोर आली नव्हती.
अशातच आता कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस पुर्ण झालेल्यांना बुस्टर डोस कधी घ्यायचा याबद्दल भारत बायोटेकच्या व्यवस्थापकीय संचालकांनी माहिती दिली आहे.
ज्यांना कोरोनाचा बुस्टर डोस घ्यायचा असेल त्यांनी कोव्हाॅक्सिन लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर 6 महिन्यांनी बुस्टर डोस घ्यावा, असं भारत बायोटेकच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
इंजेक्शन द्वारे दिल्या जाणाऱ्या औषधाप्रमाणे आता नेजल डोस म्हणजेच नाकावाटे देण्यात येणारा डोस देखील तयार असल्याचं अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलं आहे.
इंजेक्शनमार्फत घेतल्या जाणाऱ्या डोसच्या तुलनेत नेजल डोस डोस अत्यंत प्रभावी असून कोरोना विषाणूवर तो जास्त परिणामकारक असल्याची माहिती देखील भारत बायोटेकच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
नाकाद्वारे दिला जाणारा नोजल डोस सध्या चाचणीच्या टप्प्यात आहे. सध्या याची पहिली चाचणी पुर्ण झाली आहे. त्यामुळे येत्या काळात याचा अनेकांना उपयोग होऊ शकतो.
ज्या नागरिकांनी अगदी सुरूवातीला म्हणजेच जानेवारीमध्ये कोरोनाची लस घेतली होती. त्यांना बुस्टर डोस देण्यासाठी प्राधान्य दिलं जाणार आहे.
याशिवाय वैद्यकीय सेवेत असणाऱ्या डॉक्टर्स, नर्स यांना हा बुस्टर डोस सर्वात प्रथम देण्यात येईल. त्यानंतर इतर नागरिकांसाठी बुस्टर डोस दिला जाण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या-
रामदास कदमांचा पत्ता कट? ऑडिओ क्लिप प्रकरण भोवण्याची शक्यता
ठाकरे सरकारचा फडणवीसांना दणका! आता ‘या’ प्रकरणाची चौकशी होणार
मोठी बातमी! शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत राजभवनावर; राजकीय घडामोडींना वेग
“नारायण राणे यांच्यात हिंमत असेल तर…”
“उद्या सकाळी मुंबईत हायड्रोजन बाॅम्ब फुटणार”