कोरोना कधी संपणार?; तज्ज्ञांनी दिली दिलासादायक बातमी

नवी दिल्ली | कोरोना व्हायरसच्या ‘ओमिक्रॉन’ (Omicron) या नवीन व्हेरिएंटची दहशत सर्वत्र पसरण्यास सुरुवात झाली आहे. ओमिक्रॉनबाबत जगभरातून भीतीदायक आकडेवारी समोर येऊ लागली आहे. युरोपमध्ये तर ओमिक्रॉननं धुमाकूळ घातला आहे.

भारतातदेखील याचा शिरकाव झाला असून तो वेगाने पसरत आहे. कोरोनामुळे मानवी जीवनावर भयंकर वाईट परिणाम झाला आहे. आतापर्यंत लाखो लोकांचा बळी घेणारा हा विषाणू आजही जगात आहे.

भारतासह सर्वच देशांना आतापर्यंत कोरोना विषाणूची पहिली आणि दुसरी लाट सहन करावी लागली आहे. यामुळे कोरोना कधी संपणार असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. याचं उत्तर तज्ज्ञांनी दिलं आहे.

एक चांगली बातमी समोर आली आहे. त्याच वेळी, पुढील वर्षी एप्रिलपर्यंत सामान्य जीवन पूर्वीसारखे सुरू होऊ शकते, असा अंदाज आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.  एप्रिलपर्यंत कोविड-19 कमकुवत होईल. पुढील वर्षी एप्रिलपर्यंत सामान्य जीवन पूर्वीसारखं सुरू होऊ शकतं, असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

कोरोनाचा प्रभाव भविष्यात संपणार आहे. हे सामान्य व्हायरस आणि रोगासारखे होईल. त्यानंतर असे मानले जात आहे की, नवीन वर्षापूर्वी इंग्लंडसाठी कोणतेही नवीन निर्बंध लागू होणार नाहीत आणि कदाचित त्यानंतरही लागू होणार नाहीत, असं ईस्ट एंग्लिया (University of East Anglia) विद्यापीठातील मेडिसिनचे प्रोफेसर पॉल हंटर यांनी म्हटलं आहे.

हा एक असा आजार आहे जो दूर होत नाही, संसर्ग दूर होत नाही, तरीही तो फार काळ गंभीर आजार म्हणून राहणार नाही, असंही प्रोफेसर पॉल हंटर यांनी सांगितलं आहे.

कोरोनाच्या नवीन व्हेरिएंट ओमिकॉन डेल्टा पेक्षा जास्त संसर्गजन्य आहे. मात्र जोखमीच्या बाबतीत, ते आतापर्यंत डेल्टाच्या तुलनेत 50-70% कमी आहे, अशी माहिती देखील हंटर यांनी दिली आहे.

दरम्यान, कोविड-19 हा एप्रिलनंतर सामान्य व्हायरस बनेल, जो सामान्य सर्दी- खोकल्याचं कारण बनेल, असं प्रोफेसर पॉल हंटर यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘कोरोनाची त्सुनामी येणार आणि…’; WHO ने दिलेल्या माहितीने जगाचं टेंशन वाढलं  

कोरोनाचा ‘या’ अवयवावर होतोय गंभीर परिणाम?; धक्कादायक माहिती समोर 

“माझ्यात आणि मोदींमध्ये एकत्र येण्यावर चर्चा झाली होती पण…” 

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, नव्या वर्षात सरकारकडून मिळणार ‘हे’ गिफ्ट 

“…तर आम्ही 20 कोटी मुसलमान लढू”; नसिरूद्दीन शहांचं वक्तव्य चर्चेत