नवी दिल्ली : आर्थिक मंदीमुळे देशातील वाहन उद्द्योग संकटात सापडला आहे. गेल्या काही महिन्यांपासून वाहनांंची विक्री घटत चालली असून, वाहन कंपन्यांकडून रोजगारात कपात केली जात आहे. काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी अर्थव्यवस्थेची होत असलेली घसरण आणि वाहन उद्द्योगावर आलेल्या आर्थिक आरिष्टावरुन मोदी सरकारला सुनावलं आहे.
लाखो भारतीयांच्या रोजगारावर टांगती तलवार आली आहे. सरकार डोळे कधी उघडणार?, असा सवाल प्रियंका गांधी यांनी सरकारला केला आहे.
अर्थव्यवस्थेवर ओढावलेल्या आर्थिक संकटावरुन काही दिवसांपूर्वी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सरकारवर टीका केली होती. सरकारच्या चुकीमुळे अर्थव्यवस्था ढासळत चालली आहे, असं त्यांनी म्हटलं होतं.
सरकारने घेतलेल्या नोटाबंदी आणि जीएसटीच्या निर्णयामुळे भारतीय अर्थव्यवस्थेची ही अवस्था झाली आहे, अशी टीका करत अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी सरकारने तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन मनमोहन सिंग यांनी केलं आहे.
अर्थव्यवस्थेची वाट लावून सरकार मौन धरून बसलं आहे. कंपन्या संकटात आल्या असून, व्यापारही ठप्प झाला आहे. कधी नाटक करून, छळ करून, तर कधी खोटं बोलून सरकार प्रचार करत आहे. अशा गोष्टी करून सरकार देशाची अवस्था बिकट झाली असल्याचं लपवत आहे, असा शाब्दिक हल्ला प्रियंका गांधी यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
शिवसैनिकांनी मग फक्त झेंडेच उचलायचे का?; आढळरावांचा भाजपला सवाल- https://t.co/jxYyHESqpg #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 10, 2019
एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांचा राजीनामा मंजुर; या मतदारसंघातून लढवणार विधानसभा??? – https://t.co/Rznu85Yqs6 @mieknathshinde
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 10, 2019
भारत-पाकला आवश्यक वाटल्यास मी मध्यस्थीसाठी तयार- डोनाल्ड ट्रम्प – https://t.co/9g37ocs3Qr @narendramodi @realDonaldTrump
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 10, 2019