राज्यात लॉकडाऊन कधी लागणार?; राजेश टोपे म्हणतात…

मुंबई | दक्षिण आफ्रिकेतून (South Africa) समोर आलेल्या ओमिक्रॉन (B.1.1.529) विषाणूने जगाची चिंता वाढवली आहे. डेल्टा व्हेरिएंटपेक्षा ओमिक्रॉन व्हेरिएंट (Omicron variant) अधिक संसर्गजन्य असल्यामुळे केंद्र सरकार (Central Government) आणि राज्य सरकारकडून (State Government) अधिक सतर्कता बाळगण्यात येत आहे. केंद्र सरकारकडून सर्व राज्यांना ओमिक्रॉनचा प्रसार वाढू नये याकरिता अधिक खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यातच आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (State Health Minister Rajesh Tope) यांनी लॉकडाऊनबाबत एक वक्तव्य केलं आहे.

राजेश टोपे यांनी यापुढे लॉकडाऊन लावताना ऑक्सिजनच्या अनुषंगाने लॉकडाऊन लावण्याचा विचार करणार आहोत, असं सांगितलं आहे. ज्या दिवशी राज्यात 800 मॅट्रीक टन ऑक्सिजन लागेल त्यादिवशी लॉकडाऊन लावण्यात येईल. संसर्गाची गती अधिक असेल तर ऑक्सिनची 800 मॅट्रीक टनाची आवश्यकता 500 मॅट्रीक टनावर आणावी  लागेल, असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

राज्यात सद्यस्थितीत तशी परिस्थिती दिसत नाही, असं म्हणत राजेश टोपे यांनी लॉकडाऊनची शक्यता फेटाळून लावली आहे. ओमिक्रॉन रूग्णांसाठी ऑक्सिजन कमी लागण्याची शक्यता आहे, असंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

आम्हाला निर्बंध लावायचे नाहीत आणि आमचा तो हेतू नाही. फक्त काळजीपोटीच हे निर्बंध लावत असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. आम्ही लावत असलेल्या निर्बंधाचा कोणीही चुकीचा अर्थ काढू नये, आरोग्याच्या अनुषंकानं त्याकडं पाहावं, असं त्यांनी म्हटलं आहे.

फ्रान्स आणि ब्रिटनमध्ये रूग्णवाढीचा वेग पाहायला मिळत आहे. याकारणामुळे आत्ताच जर महाराष्ट्रात खबरदारी घेतली नाही तर राज्यात रूग्ण वाढण्याची भिती अधिक आहे, असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. राज्यात तिसरी लाट आली तर ओमिक्रॉनचीच असेल, असंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेले निर्बंध गर्दी रोखण्यासाठीचं जारी केलेले आहेत. वर्षाअखेरीस होणाऱ्या पार्ट्या, त्याप्रमाणेच उत्सव यांच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊन ओमिक्रॉनचे रूग्ण वाढू नये याकरिता राज्य सरकारने रात्रीच्या जमावबंदीचा निर्णय घेतल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं.

राज्यात वाढणाऱ्या ओमिक्रॉन विषाणू रूग्णसंख्येत होणाऱ्या वाढीबाबत राजेश टोपे यांनी चिंता व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात सध्याच्या घडीला ओमिक्रॉनचे रूग्ण इतर राज्याच्या तुलनेत सर्वात जास्त आहेत. यामुळेच लग्न समारंभ, हॉटेल्स सिनेमा हॉल्स, यांबाबत निर्बंध जारी करण्यात आले आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे.

दुप्पटीन रूग्णसंख्या वाढण्याचं प्रमाण असंच सुरू राहिलं तर आणखी कडक निर्बंध लावण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे वेळीच धोका ओळखून लोकांनी गर्दी टाळावी, निर्बंध पाळावेत आणि सरकारला सहकार्य करावं, असं आवाहन राजेश टोपे यांनी केलं आहे.

यावेळी बोलताना राजेश टोपे यांनी शाळांबाबत (schools) वक्तव्य केलं आहे. तूर्तासतरी सरकारने शाळांबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे सध्या शाळा सुरू आहेत. त्या तशाच सुरू राहतीलं तसेच चिमुकल्यांच्या लसीकरणाबाबतही सरकार प्रयत्नशील आहे, असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 
‘राज्यात तिसरी लाट ही ओमिक्राॅनची असेल’; राजेश टोपेंनी व्यक्त केली भिती

 मला तर वाटतं मरावं आणि त्या राणी बागेतल्या…- सुधीर मुनगंटीवार

‘या’ मल्टीबॅगर स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं करोडपती! 

“…त्यात आमचा कार्यकर्ता असेल तर त्यालाही फासावर लटकवून टाका” 

‘ही प्रजाती फक्त भंगारात आढळते’; मलिकांच्या ट्विटला नितेश राणेंचं प्रत्युत्तर