खेळ

पतीची कामगिरी खराब झाली तरी दोष पत्नीवरच येतो- सानिया मिर्झा

नवी दिल्ली | लॉकडाउन काळात सर्व भारतीय क्रिकेटपटू आपल्या घरात राहून परिवारासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करत आहेत. काही खेळाडू सोशल मीडियावर विविध उपक्रमात सहभागी होऊन, आपल्या चाहत्यांशी संवाद साधतात.

भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा महिला क्रिकेटपटू जेमिमा रॉड्रीग्ज आणि स्मृती मंधाना यांच्या Double Trouble या कार्यक्रमात सहभागी झाली होती. यावेळी सानिया मिर्झाने क्रीडापटू पती-पत्नीबद्दल असलेल्या विचारांवर भाष्य केलं आहे.

ज्या वेळी आपले पती मैदानात चांगली कामगिरी करतात, त्यावेळी ती त्यांच्या स्वतःच्या कौशल्यावर असते, आणि ज्यावेळी त्यांची कामगिरी खराब होते त्याचा दोष पत्नीवर येतो. मला माहिती नाही, असा विचार लोकं कसा करु शकतात, असं सानियाने म्हटलंय.

दरम्यान, यावेळी सानियाने विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मामधल्या नात्याचंही कौतुक केलं.

महत्वाच्या बातम्या-

-खडसे आणि पंकजा मुंडे स्वतःच स्वतःला समजावून सांगतील- चंद्रकांत पाटील

-मुंबईतील ‘या’ 18 वर्षीय तरुणाच्या कंपनीत रतन टाटांकडून गुंतवणूक

-पक्षाला ज्यांनी शिव्या घातल्या त्यांना तिकीट दिलं; उमेदवारी डावलल्यानंतर खडसेंचं आक्रमक रूप

-गरीबांच्या खात्यात साडे सात हजार रूपये जमा करा; राहुल गांधी यांची पंतप्रधानांकडे मागणी

-पदवी, पदव्युत्तर परीक्षांबाबत उदय सामंतांचा मोठा निर्णय, वाचा कुणाच्या होणार परीक्षा अन् कुणाच्या नाही…!