मुंबई | लहान-थोरांच्या जिव्हाळ्याचं आणि आपल्या हक्काचं वाहन जर कोणतं असेल तर ते म्हणजे एसटी बस आहे. लालपरीच्या रूपानं राज्यात आपल्या सोईचं वाहन रस्त्यावर धावताना आपण पाहिलंय.
एसटी महामंडळाच्या माध्यमातून लालपरीचा कारभार पाहिला जातो. लालपरी राज्याच्या रस्त्यावर धावायला लागली की आपल्या नागरिकांना कसलाच त्रास जाणवत नाही.
गेल्या काही दिवसांपासून लालपरीचा सांभाळ करणारे हात संपावर आहेत. परिणामी राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडून पडली आहे. लालपरीच्या कर्मचाऱ्यांना विविध मागण्यांसाठी सध्या रस्त्यावर उतरावं लागलं आहे.
वाढत चाललेला कर्जाचा बोजा, कर्मचाऱ्यांना अपुऱ्या पगारी, दर्जाहिन सुविधा या विविध मागण्यांसाठी राज्यात गेल्या 15 दिवसांपासून एसटी कर्मचारी संपावर आहेत.
कामाचा तितकाच ताण पण सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणं सुविधा नाहीत या मागणीला घेऊन राज्यातील सर्व कर्मचारी संपावर गेले आहेत. सरकारनं कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करूनही काही समाधान होत नाहीये.
अशा परिस्थितीत राज्यातील राजकीय नेते एकमेकांवर जोरदार टीका करत आहेत. भाजप आणि सत्ताधारी महाविकास आघाडी यांच्यात चांगलंच रण पेटलं आहे.
माजी मंत्री महादेव जानकर यांनी आज यावर आपलं मत व्यक्त केलं आहे. आमचं सरकार असताना तर कुठं झालं विलीनीकरण, असं जानकर म्हणाले असल्यानं सध्या या वक्तव्याची जोरदार चर्चा रंगली आहे आहे.
आमचं सरकार असतानाही हा प्रश्न निर्माण झाला होता. तेव्हा तरी कुठं हा प्रश्न सोडवण्यात आला, असा घरचा आहेर फडणवीस सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या जानकर यांनी भाजपला दिला आहे.
रस्त्यावर असताना एक आणि सत्तेत गेलं की एक बोलावं लागतं. हा सिस्टीमचा एक भाग आहे. परिणामी जनतेनं हुशार व्हावं, असंही जानकर म्हणाले आहेत.
दरम्यान, महादेव जानकर यांच्या या वक्तव्यान भाजपच्या अडचणीत वाढ होवू शकते. कारण भाजपचे नेते एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात सर्वात पुढच्या रांगेत बसले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
“कंगणाचं संरक्षण आणि पुरस्कार पाहून गोखलेंनाही पद्मश्री व्हायचंय दिसतंय”
“हरबल गांजा ओढा आणि तहान लागली की मद्यप्राशन करा”
“जे एअर इंडिया, रेल्वे विकतात, त्यांनी एसटीवर बोलू नये”
शिवसेनेला मोठा धक्का, ‘या’ नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
33 वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती; वडिलांप्रमाणे राकेश टिकैत यांनी केंद्राला झुकवलं