मुंबई | गोव्यात भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसला अनेक बाजूंनी मदत करण्यासाठी प्रयत्न केले. परंतु, त्यांना ते समजलं नाही. आघाडी न करता बहुमताचा आकडा गाठण्याचा काँग्रेसला एवढा आत्मविश्वास कोठून येतो?, असा टोमणा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला मारला आहे.
गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांनी नुकताच भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पण उत्पल यांचा जन्म ज्या पक्षात झाला तो पक्ष सोडताना त्यांना खूप वेदना झाल्या. त्यांच्या वेदना मी समजू शकतो, असं राऊत म्हणालेत.
उत्पल पर्रिकरांचा भाजपकडून अपमान करण्यात आला आहे. गोव्याची जनता हा अपमान विसरणार नाही, अशी टीका संजय राऊत यांनी भाजपवर केली.
संजय राऊत यांनी भाजपवर अनेक आरोप केले. मनोहर पर्रिकर यांनी गोव्याचं नाव देशात उंचावलं. परंतु आज त्यांच्याच मुलाचा अपमान भाजपकडून करण्यात आला, असंही ते म्हणाले.
मनोहर पर्रिकर यांनी ज्या जागेचं प्रतिनिधीत्व केलं त्या जागेवर आज अनेक आरोप असलेल्या उमेदवाराला भाजपकडून तिकीट देण्यात आलं आहे. या उमेदवारावर भ्रष्ट्राचार, माफियासह बलात्काराचे आरोप आहेत, असंही ते म्हणाले.
गोव्यात भाजप वाढवण्यासाठी मनोहर पर्रिकर आणि लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी खूप प्रयत्न केले. पण आज मनोहर पर्रिकर यांच्या मुलाचा भाजपकडून अपमान करण्यात येत आहे तर लक्ष्मीकांत पार्सेकर यांना तिकीट नाकारलं आहे. पार्सेकर यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवल्यानंतर त्यांचं डिपॉझिट जप्त झालं होतं पण ते लढत राहिलं आणि गोव्यात भाजप वाढवत राहिले. परंतु आज त्यांनाच भाजपने तिकीट नाकारलं आहे. भाजपला हे परवडणारं नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, पणजीऐवजी बिचोलीतून उमेदवारी घ्यावी हा भाजपचा प्रस्ताव उत्पल पर्रिकर यांनी नाकारला असून आता ते पणजीतून अपक्ष लढणार आहेत. तशा प्रकारची घोषणा त्यांनी केली. उत्पल पर्रिकरांचा हा निर्णय भाजपसाठी मोठा धक्का असल्याचं सांगण्यात येतंय. उत्पल पर्रिकर हे भाजपचे दिवंगत नेते मनोहर पर्रिकर यांचे पुत्र आहेत.
गोव्यासाठी भाजपकडून 34 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. भाजपच्या या यादीत पणजीतून उत्पल पर्रिकर यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. त्याऐवजी त्यांना बिचोलीतून निवडणूक लढवण्याचा पर्याय देण्यात आला होता. त्यामुळे उत्पल पर्रिकरांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे.
महत्वाच्या बातम्या-
अमोल कोल्हे प्रकरणावर नाना पाटेकरांनी घेतली स्पष्ट भूमिका, म्हणाले…
मोठी बातमी! अर्थमंत्र्यांबरोबर महाराष्ट्रातील ‘हा’ मंत्री सादर करणार बजेट!
अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणी महत्वाची माहिती समोर!
“कफ सिरपमध्ये चिकन शिजवून खाल्ल्याने सर्दी-खोकला गायब होतो”
Petrol Diesel Price | पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, वाचा आजचे ताजे दर