मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेनंतर राज्यातील राजकारणाला वेग आल्याचं पहायला मिळतंय. भाजप आणि शिवसेना पुन्हा एकदा आमने सामने आले आहेत.
नारायण राणे यांची ईडीनं चौकशी सुरु केल्यानं घाबरून जाऊन ते भाजपला सरेंडर झाले, असा आरोप विनायक राऊत यांनी केला होता. त्यावर आता नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिलंय.
खासदार विनायक राऊत यांच्यासाठी खास बातमी, असं म्हणत नारायण राणे यांनी दोन ट्विट केेले आहेत. त्यावेळी त्यांनी शिवसेनेसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला.
लवकरच सुशांतसिंग प्रकरण आणि सामुदायिक बलात्कार करून तिची हत्या केलेल्या त्या दिशा सालियन प्रकरणाची चौकशी होईल. या दोघांचीही आत्महत्या नव्हे हत्या झाली त्यांचीही चौकशी परत होईल, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.
एवढंच नाही तर मातोश्रीवरील चौघांसाठी ईडीची नोटीस तयार असल्याचं देखील कळतंय, असा सुचक इशारा नारायण राणे यांनी दिला आहे.
विनायक राऊत हे घडल्यावर आपले बॉस आणि आपण कुठं धावणार?, असा सवाल करत त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय.
दरम्यान, मातोश्रीच्या चौघांवर ईडीची नोटीस तयार असल्याचं नारायण राणे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीचा चेहरा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना ईडीच्या कारवाईला सामोरं जावा लागेल का?, असा सवाल आता उपस्थित केला जातोय.
महत्त्वाच्या बातम्या –
Google वर कधीही ‘काॅल गर्ल’ सर्च करू नका, तुमच्यासोबतही घडू शकतो धक्कादायक प्रकार
फरहान-शिबानीच्या हळदीची एकच चर्चा, रिया चक्रवर्तीचा डान्स तुफान व्हायरल; पाहा व्हिडीओ
“किरीट सोमय्यांना वाॅचमनची नोकरी द्या, नाहीतर माळ्याची नोकरी द्या…”
विराटच्या RCBला मिळणार नवा कर्णधार; आता धोनीचा ‘हा’ भिडू सांभाळणार जबाबदारी
मुंबईच्या बोरिवली परिसरातील 24 मजली इमारतीला भीषण आग, अनेकजण अडकल्याची भीती