मुंबई | विधान परिषदेवरील राज्यपाल निर्देशित आमदारांच्या नियुक्त्यांना लवकरच मुहूर्त मिळण्याची चिन्हं दिसत आहेत. राज्यपाल नियुक्त विधान परिषदेत 12 जागांच्या नावांवर चर्चा करण्यासाठी मंत्रीमंडळाची आज बैठक होणार आहे. एप्रिल महिन्यात विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 जागा रिकाम्या राहिल्या होत्या.
राज्यपाल नियुक्त या 12 नावांची यादी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज होणाऱ्या बैठकीत काढली जाईल. ही यादी मंत्रीमंडळाकडून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पाठवण्यात येईल. इच्छुक उमेद्वारांच्या नावांसाठी सत्ताधारी पक्षांमागे बरीच मोठी रांग लागली आहे.
पक्षनेतृत्वांसमोर ही नावे निवडण्याचं खूपच मोठं आव्हान आहे. राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी एका पक्षाला ४ जागा मिळनार आहेत. त्यामुळे कोणत्या नावाचा गुणगौरव करायचा हा प्रश्र्न पक्षनेतृत्वासमोर उभा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुकांच्या यादीत सर्वप्रथम अलीकडेच भाजपाला रामराम करुन आलेले एकनाथ खडसे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, उत्तमराव जानकर, शिवाजीराव गर्जे, आदिती नलावडे, गायक आनंद शिंदे, श्रीराम शेटे यांची नावे आहेत.
गेल्या वर्षी विधान परिषदेच्या २ जागा रिक्त झाल्यानंतर राष्ट्रवादीने आदिती नलावडे, शिवाजीराव गर्जे यांच्या नावाची शिफारस राज्यपालांकडे केली होती. मात्र अजूनही त्यावर कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.
शिवसेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर, माजी मंत्री सचिन अहिर, माजी आमदार सुनील शिंदे, युवा सेनेचे राहुल कनाल, विजय करंजीकर, भाऊसाहेब चौधरी, नितीन बानगुडे पाटील आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या नावांची चर्चा आहे.
राज्यपालांनी विधान परिषदेच्या जागांबाबत निर्णय घेतला नाही म्हणून सत्ताधारी पक्ष नाराज आहे. परंतु राज्य सरकारकडून तारीफ झाली नसल्याचं स्पष्टीकरण राजभवनाकडून देण्यात आलं आहे.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारकडून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिच्या नावाची तारीफ ही विधान परिषदेच्या जागेसाठी करण्यात येऊ शकते. मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर उर्मिलाने भाजपाच्या गोपाळ शेट्टी यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत उर्मिलाचा पराभव झाला होता.
महाराष्ट्र विधान परिषदेत 12 सदस्य नियुक्त करण्याचे राज्यपालांना अधिकार आहेत. कला, विज्ञान, सहकारी चळवळ आणि सामाजिक कार्य अशा क्षेत्रातील तज्ज्ञ किंवा प्रत्यक्ष कामाचा अनुभव असलेल्या व्यक्तींची राज्यपाल विधान परिषदेवर नियुक्ती करु शकतात. तज्ज्ञांच्या अनुभवाचा राज्याला फायदा होतो.
महत्त्वाच्या बातम्या-
उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर पवारांचा घणाघात! महाविकास आघाडी सरकारसाठी धोक्याची घंटा?
बारमध्ये स्त्रियांना ‘नो शर्ट फ्री बियर’ ऑफर! मुंबईतील ‘या’ बारमधील धक्कादायक प्रकार
कोरोनानंतर भारतीयांमोर नविन संकट! वैज्ञानिकांनी दिला धक्कादायक इशारा
सुशांत प्रकरणाला धक्कादायक वळण! आता सुशांतच्या बहिणीच गजाआड जाणार?