मुंबई | सोशल मीडियावर हल्ली वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये काही व्हिडीओ खूपच धक्का देणारे आणि भितीदायक असतात. तर त्यातील काही व्हिडीओ खूपच मजेशीर असतात.
आपल्या माहित आहे की, बऱ्याच लोकांना डान्स करायला आवडतो. काहींना तर कोणत्याही ठिकाणी एखादं गाणं ऐकलं तरी ते त्याच्यावर डान्स करायला लागतात. याच संदर्भातील एका लहान चिमुकलीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
लहान मुल म्हटलं की, घरात पडझड ही आलीच. ज्यांच्या घरात लहान मुल असतं त्यांच्या घरात कितीही आवरलं तरी पसारा हा असतोच. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगी तिच्या घरामध्ये एका गाण्यावर डान्स करत असल्याचं दिसून येतं आहे.
टीव्हीवर एक गाण लागलं आहे आणि ती त्या गाण्यावर डान्स करत आहे. ती डान्स करताना खूपच आनंदी असल्याचं पाहायला मिळतं आहे.
नाचता-नाचता ती त्या टीव्हीजवळ जाते आणि टीव्ही आपल्या अंगावर पाडून घेते. तसेच हा व्हिडीओ ‘अहमेद अंसारी’ या फेसबुक यूजरने आपल्या आकाऊंटवरून शेअर केला आहे.
त्याचप्रमाणे चिमुकलीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ 2.4 मिलीयन इतक्या लोकांनी पाहिला आहे. या व्हिडीओला आता पर्यंत जवळजवळ 65 हजार लोकांनी लाईक केलं असून, अनेकांनी कमेंट्सही केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
अभिनेता सोनू सूदने केलेला स्टंट पाहून तुम्हालाही बसेल धक्का, पाहा व्हिडीओ
मोठी बातमी! सिद्धार्थ शुक्ला प्रकरणी पोलिसांनी दाखल केला गुन्हा
पाण्यात उडी मारायला गेला अन्…, पाहा काळजाचं पाणी करणारा व्हिडीओ
‘सिद्धार्थचा मृत्यू हार्ट अटॅकमुळे होऊ शकत नाही’, सिद्धार्थच्या जिम ट्रेनरचा खळबळजनक दावा