‘राजा हिंदूस्तानी मधील तो किंसींग सीन करताना मी…’; करिश्मा कपूरने सांगितला तो किस्सा

फेब्रुवारी महिना म्हणजे ‘प्रेमाचा’ महिना असं मानलं जातं. यातचं काल ‘किस डे’ असून आपल्याला सगळीकडे प्रेमाचं वातावरण पहायला मिळालं. यातच अनेक चित्रपटांमध्ये आपल्याला किसिंग सीन पाहायला मिळतात. मात्र, एका चित्रपटातील किसिंग सीन आपल्याला माहिती असेलचं.

1996 साली प्रदर्शित झालेला ‘राजा हिंदूस्थानी’ या सिनेमातील अमिर खान आणि करिश्मा कपूर यांच्यात झालेल्या किसिंग सीन नव्वदच्या दशकात खूप गाजला होता. त्या दशकातील सगळ्यात जास्त कालावधीचा किंसिंग सिन म्हणून हा सीन ओळखला जातो.

राजा हिंदूस्तानी सिनेमा अमिर खान आणि करिश्मा कपूर यांच्यावर चित्रीत करण्यात आला होता. या सीनचे शुटींग सुरु असताना करिश्मा अक्षरश: थरथरत होती असे तिने एका मुलाखतीच्या दरम्यान सांगितले होते.

करिश्माने सांगितले होते की, या सीनच्या शुटींगला आम्हाला तीन दिवस लागले होते. शुटिंग फेब्रुवारीत उटीमध्ये झाले होते. त्याकाळात तिथे प्रचंड थंडी असते. थंडीने मी अक्षरश: कापत होते. या सीनचे शुटींग कधी संपेल असे मला झाले होते. कारण प्रचंड थंडी असतानाही आम्ही थंड पाण्यात भिजून या सीनचे शुटींग करत होतो.

सकाळी सात वाजल्यापासून तर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आम्ही या सीनचे शुटींग करत होतो. राजा हिंदूस्तानीमधील हा किंसींग सीन जवळजवळ एक मिनिटाचा होता. आताच्या सिनेमांमध्ये असा किंसिंग सीन पाहायला मिळतो. पण त्याकाळी हा सीन अतिशय बोल्ड मानला गेला होता.

राजा हिंदूस्तानी या सिनेमाला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. विशेष म्हणजे त्या चित्रपटाचे गाणे देखील हिट झाले होते आणि ते गाणी आज देखील लोकांच्या ओठांवर आहेत. या चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर प्रचंड कमाई केली होती. अमिर खान आणि करिश्मा कपूर यांच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक केले होते.

या सिनेमासाठी दोघांना पुरस्कार देखील मिळाला होता. या सिनेमात त्या दोघांशिवाय सुरेश ओबेराॅय, जाॅनी लिव्हर, अर्चना पुरण सिंग, फरिदा जलाल यांच्या मुख्य भुमिका होत्या. अमिर खानसोबत जो लहान मुलगा दाखवला आहे, तो दुसरा तिसरा कुणी नाही तर कुणाल खेमू होता. कुणाल खेमूने देखील बरेच चित्रपटांत काम केलं आहे.

राजा हिंदूस्तानी या चित्रपटात एक टॅक्सी चालवणारा साधारण मुलगा आणि अतिशय श्रीमंत मुलीची प्रेमकथा दाखवली होती. अमिर खानचे असे बरेच चित्रपट गाजले आहेत. मध्यंतरी अमिर खानचा एक कार्यक्रम आला होता. तो म्हणजे ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमाला देखील लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता.

अमिर खानने आणखी एक योजना राबविली होती. ती म्हणजे ‘पाणी फाउंडेशन’ त्यात शेतकऱ्यांनी प्रचंड प्रमाणात प्रतिसाद दिला होता. त्यावेळी अनेक गावांनी त्यात सहभाग घेतला होता आणि खूप गावांना देखील पुरस्कार मिळाला होता.

महत्वाच्या बातम्या –

नात्यातील गोडवा वाढवणाऱ्या ‘व्हॅलेंटाईन डे’ची सुरुवात कशी झाली? वाचा सविस्तर

‘सैराट’ मधील लंगड्या प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येतोय ‘हा’नवीन चित्रपट

…..म्हणून सलमान खान सिनेमात अभिनेत्रीला किस करत नाही

ब्युटी ट्रिटमेंट करत असाल तर सावधान; तुमच्यासोबतही ‘हे’ घडू शकतं….

धक्कादायक! कोरोनाच्या नव्या लक्षणानं कापावी लागली हाताची बोटं