हॉट सीन करताना मी प्रचंड घाबरले मग बॉबीने…; ‘आश्रम’ वेबसिरीजमधील अभिनेत्रचा खुलासा!

मुंबई | प्रकाश झा यांची ‘आश्रम’ ही वेबसिरीज रिलीज झाल्यानंतर सर्वत्र त्याची चांगलीच चर्चा रंगली होती. ही वेबसिरीज भक्ती आणि श्रद्धेच्या नावाखाली होणाऱ्या गैरकारभाराला उघडपणे सर्वांसमोर मांडते. यामुळे आश्रम वेबसिरीज प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली होती. अशातच आता आश्रममध्ये बोल्ड सीन देणाऱ्या एका अभिनेत्रीने चित्रिकरणादरम्यानचे काही खुलासे केले आहेत.

अभिनेत्री त्रिधा चौधरी हिने आश्रम वेबसिरीजमध्ये बॉबी देओलसोबत काही हॉट सीन्स दिले आहेत. याच सीन्सवर त्रिधाने आपलं मत मांडलं आहे. नुकतीच ती एका मुलाखतीत याविषयी खुलेपणाने बोलली आहे.

आश्रम मधील हॉट सीन्सविषयी बोलताना त्रिधा म्हणाली की, बॉबी देओलसोबत हॉट सीन करताना मला भीती वाटली होती. मी चिंताग्रस्त होते. परंतु कुठेतरी मला कल्पना आली होती की, बॉबी माझ्यासोबत काही चूक करणार नाही.

पुढे बोलताना त्रिधा म्हणाली की, हॉट सीन देण्यास माझी काहीच हरकत नसते. परंतु मी ब्रँड पाहून काम करते. चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? माझ्या सहकलाकाराचे स्वरूप काय आहे? हे पाहून मी काम करते.

तसेच आश्रममध्ये मी दिलेले सीन्स काही लोकांना आवडले तर काहींनी त्याचा विरोध केला. परंतु मला लोकांना सांगायचं आहे की एकदा तुम्ही स्वतः कॅमेऱ्यासमोर या, शूट कसे करायचं हे जाणून घ्या आणि मग एखाद्यावर टीका करा, असं म्हणत त्रिधाने टीका करणाऱ्यांची चांगलीच शाळा घेतली आहे.

दरम्यान, त्रिधा चौधरी ही एक बंगाली आणि तेलगू चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. 2013 मध्ये तिने चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं होतं. यानंतर तिने एकापाठोपाठ एक हिट चित्रपट देत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

त्रिधाने यापूर्वी देखील हॉट सीन्स दिले आहेत. तिने अनेक सहकलाकारांसोबत किसिंग सीन केले आहेत. आश्रमपूर्वी ती ‘स्पॉटलाईट’ या वेबसिरीजमध्ये दिसली होती.

महत्वाच्या बातम्या –

सलमान खानला अडवणाऱ्या ‘त्या’ सीआयएसएफच्या जवानाचं होतंय सर्वत्र कौतुक, पाहा व्हिडीओ!

बिअर पिण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहे का?, जाणून घ्या!

…अन् पठ्ठ्यानं लसीकरण प्रमाणपत्रावरील क्यूआर कोडच टॅटू म्हणून काढला, पाहा व्हिडीओ!

मुलगा हिरो झाला म्हणून मी किसिंग सीन करायचे नाही का? – जॅकी श्रॉफ

ती वॉश बेसिनमध्ये पाय धुवायला गेली अन् बदकन आदळली; पाहा व्हिडीओ