आज काल आपण अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहतो. त्यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात, तर काही आपल्याला चकीत करणारे असतात.
काही व्हिडीओ तर आपल्याला प्रेरणा देणारे असतात. तर काही कीही व्हिडीओंवर आपल्याला विश्वासही बसत नाही असे असतात. आपण सोशल मीडियावर प्राणी-पक्ष्यांचे अनेक सुंदर व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ खूपच क्यूट असतात.
आपल्याला माहित असेल की, अनेकदा जंगलातील प्राणी रहदारीच्या रस्त्यावरून जात असतात. अशातच याच संदर्भात एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक हत्ती रस्त्याच्या मधोमध उभा असल्याचं दिसून येतं आहे. रस्ता तसा सुमसान असल्याचं दिसत आहे. तसेच या रस्त्याच्या कडेला अनेक घनदाट झाडी असल्याचंही व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं आहे.
हत्ती रस्ता ओलांडत असताना अचानक मागच्या बाजूने स्कुटीवर एक माणूस येत असतो. हे तो हत्ती पाहतो आणि जागीच थांबतो. परंतू अचानक एवढा मोठा हत्ती समोर पाहिल्यानंतर कोणालाही भिती वाटेल. तशीच भिती त्या स्कुटी चालकाला वाटत असल्याचं त्याच्याकडे पाहून कळतं आहे.
धाडस करत तो स्कुटीवाला हळूृ-हळू पुढे येतो आणि हत्तीच्या जवळ आल्यानंतर त्याच्या पासून गाडी फार लांबून कट मारतो. मात्र हत्तीच्या भितीने तो खूप घाबरून गेला होता. त्यामुळे त्याचे सगळे लक्ष गाडी चालवण्याकडे नव्हते तर तो हत्ती आपल्या अंगावर येतो की काय या विचारात तो होता.
या विचारांमुळे पुढे जाऊन तो व्यक्तीची गाडी घसरली आणि तो खाली पडला. त्यानंतर तो तातडीने उठून उभा राहिला आणि आपल्याला कुठे लागलं आहे का, हे पाहू लागला. हे सगळं करत असताना तरीही त्याचे लक्ष हे हत्तीकडेच होते. मात्र हत्ती आहे त्याच जागी उभा राहून त्याच्याकडे बघत होता.
तसेच हा व्हायरल होत असलेला व्हिडीओ आयएफएस अधिकारी प्रविण कासवान यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरून शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना त्यांनी ‘What this elephant must be thinking. Any guess. A forward.’ असं कॅप्शनही दिलं आहे.
हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून, आतापर्यंत या व्हिडीओला खूप लोकांनी पाहिलं आहे. त्याचप्रमाणे या व्हिडीओला अनेक कमेंटही केल्या आहेत.
What this elephant must be thinking. Any guess. A forward. pic.twitter.com/q4o8FIEfIy
— Parveen Kaswan, IFS (@ParveenKaswan) May 17, 2021
महत्वाच्या बातम्या-
पुढील काही तासांत मुंबईसह ‘या’ भागात होणार…
भयानक चक्रीवादळातही ‘ती’ महिला पावसात भिजत मारत…
घरात जागा नाही म्हणून ‘तो’ चक्क 11 दिवस झाडावर…
लग्नातील वऱ्हाड्यांची तुफान हाणामारी, पाहा व्हायरल व्हिडीओ
कुत्र्याला लाथ मारायच्या नादात रिक्षाचालकाचा तोल सुटला…