मुंबई | सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये काही व्हिडीओ प्रेरणा देणारे असतात. तर काही व्हिडीओ खूप धक्कादायक असतात. त्याचप्रमाणे त्यांमध्ये कधी डान्स करतानाचे, तर कधी गाण म्हणतानाचेही व्हिडीओ असतात.
आपल्या सगळ्यांना जेवणानंतर स्वीट डिशही असतेच. त्यामध्ये काहींना काही तरी गोड खावसं वाटतं. तर काहींना आईस्क्रिम खावीशी वाटते. प्रत्येकाच्या आवडी-निवडी या वेगवेगळ्या असतात आणि हेही आपल्याला चांगलंच माहिती आहे. अनेकदा लहान मुलं बाहेर फिरायला गेली की, ती त्यांच्या आई-बाबांकडे गाडीवरील आईस्क्रिम खाण्याचा हट्ट करतात.
परंतू मुलांच्या आरोग्यासाठी आई-वडील मुलांचा हट्ट पूरवत नाही. मात्र अनेकदा मुलांपेक्षा आई-वडीलांनाच आईस्क्रिम खावीशी वाटत असते. पण जर त्यांनी खाल्ली, त्यांना जरी मुलांनी खातानी पाहिलं तर मुलांनाही द्यावी लागेल या हेतूने आई-वडील अशा गोष्टी करण टाळतात.
अशातच याच संदर्भातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मुलाचे आई-वडील आपल्या मुलाला सोडून एक-एकटे आईस्क्रिम खाताना दिसत आहेत. हे चित्र पाहायला थोडं वेगळ वाटत आहे. कारण आई-वडील आपल्या मुलांना सोडून अशा गोष्टी करत नाही. निदान खाण्याच्या तरी
व्हिडीओमध्ये नवरा-बायको डायनिंग टेबलवर बसले आहेत. त्या दोघांच्या हातात एक-एक आईस्क्रिम आहे, ते दोघं ती खातही आहेत. बायको आपल्या फोन बघत खात आहे, तर नवरा काही न करता केवळ त्या आईस्क्रिमचा स्वाद घेत आहे. हे सगळं सुरू असताना. अचानक मागून त्यांचा मुलगा येतो आणि त्याच्या आईला आवाज देतो.
त्याची हाक ऐकून तो दोघंजण डचकतात आणि त्या मुलाची आई आपल्या हातातील आईस्क्रिम त्याच्या बाबांच्या टी-शर्टमध्ये टाकते. त्याच्या आईचीच नाहीतर ती तिच्या नवऱ्याचीही आईस्क्रिम त्याच्याच टी-शर्टमध्ये टाकते. जेणेकरून मुलाला याबद्दल कळू नये.
आईस्क्रिम खूप गार असल्यामुळे आणि तेही अचानक टाकल्यामुळे तिच्या नवऱ्याला काय करावं ते सुचत नाही. त्यामुळे त्याचे डोळेच पांढरे पडले असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
महत्वाच्या बातम्या-
प्रॉपर्टीवर डोळा असलेल्या नातवाला आजीने दिलं जबर उत्तर, पाहा व्हिडीओ
दारूची बाटली हातात घेऊन डान्स करण्याऱ्या तरूणीचा ‘हा’ व्हिडीओ होतोय सोशल मीडियावर तूफान व्हायरल
प्रेम विवाहाला पाठिंबा दिला म्हणून दोघा भावांना मिळाली ‘ही’ अजब शिक्षा, वाचा सविस्तर
तुम्हीही ऑनलाईन फूड ऑर्डर करत असाल तर, ‘हा’ व्हिडीओ नक्की बघा