सोशल मीडियावर आज काल आपण अनेक व्हिडीओ व्हायरल झालेले पाहतो. त्यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात, तर काही आपल्याला चकीत करणारे असतात.
काही व्हिडीओ तर आपल्याला प्रेरणा देणारे असतात. तर काही कीही व्हिडीओंवर आपल्याला विश्वासही बसत नाही असे असतात. आपण सोशल मीडियावर पक्षु-पक्षांचे, प्राण्यांचे अनेक सुंदर व्हिडीओ व्हायरल झालेले पाहतो. त्यातील काही व्हिडीओ खूपच क्यूट असतात. तर काही खूपच धक्कादायक असतात.
तसेच अनेकदा आपण जंगलातील प्राण्याचे व्हिडीओ पाहतो. त्यात काही हाणामारीचे व्हिडीओ असतात, तर एखादा प्राणी दुसऱ्या प्राण्याची शिकार करतानाचा व्हिडीओ असतो. याच संदर्भातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
आपण पाहिले असेल की सिंह हा जंगलाचा राजा असल्यामुळे त्याला सगळेच प्राणी घाबरतात. त्याच्यासमोर कोणीचीही जायची हिंमत होत नाही. त्याचप्रमाणे सिंह हा शिकार करण्यातही तरबेज असतो. आतापर्यंच आपण सिंहाला अनेकदा प्राण्यांची शिकार करताना पाहिले असेल. परंतू सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये सिंह अनोख्या पद्धतीने शिकार करताना दिसत आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये सिंह एका बिबट्याची शिकार करत आहे. विशेष म्हणचे सिंहाने बिबट्याला एका उंच झाडावर घेऊन त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहे.
सुरूवातीला ते दोघे झाडाच्या एका फांदीवर असतात. त्यावेळी सिंह बिबट्याला खायचा प्रयत्न करत असतो. मात्र ते दोघे ज्या फांदीवर उभे आहेत, त्या फांदीवर त्यांचे वजन जास्त झाल्यामुळे ती फांदी तुटते. फांदी तुटल्यानंतर सिंह आणि बिबट्या खाली पडतात.
बिबट्यासाठी झाडाची फांदी तुटणे, हे एक जीवनदान मिळाल्यासारखंच होत. त्यानंतर सिंहाच्या काही लक्षात यायच्या आतच बिबट्या लगेचच त्या ठिकाणाहून धूम ठोकतो.
हा व्हायरल व्हिडीओ ‘@almodeeer1975’ या यूजरने आपल्या ट्विटर आकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओला अनेकांनी पाहिलं असून, या व्हिडीओला वेगवेगळ्या कमेंटही येत आहेत.
الجوع جعل اللبؤة تصعد أعلى الشجرة وتستولي على فريسة انثى الليبورد . pic.twitter.com/WBq1Nyl8Qj
— عالم الحيوان (@almodeeer1975) April 30, 2021
महत्वाच्या बातम्या-
कोरोना झाल्यावर बेड मिळणार नाही या भीतीनं पत्रकाराची…
रिया चक्रवर्तीच्या काकांचं कोरोनामुळं निधन; पोस्ट शेअर करत…
‘या’ प्राणीसंग्रहालयातील चक्क 8 सिंहांना झाली…