काय बोलावं आता! टीव्हीवर लाईव्ह असतानाच कुत्र्यानं तिच्या हातातला माईक खेचला अन्…; पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळ्या गोष्टी व्हायरल होत असतात. यातील काही गोष्टी आपल्याला चांगली शिकवण देतात. तर काही गोष्टी आपलं चांगलं मनोरंजन करुन जातात. सध्या असाच एक खळखळून हसवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

लाईव्ह कार्यक्रमात नको ते घडून गोंधळ उडल्याच्या अनेक घटना आजवर समोर आल्या आहेत. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये देखील असंच काहीसं घडलं आहे. लाईव्ह रिपोर्टिंग करणाऱ्या एका रिपोर्टरच्या हातातील माईक कुत्र्याने पळवल्याने तिची चांगलीच धांदल उडाली आहे.

सोशल मिडीयावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ रशियातील असल्याची माहिती समोर आली आहे. रशियाच्या मास्को शहरात ही घटना घडली आहे. रिपोर्टरचा हा व्हिडीओ पाहून तुम्हाला देखील हसू आवरणार नाही.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मॉस्को शहरातील एक पत्रकार रस्त्यावर लाईव्ह रिपोर्टिंग करत असते. यावेळी रिपोर्टरच्या हातामध्ये एक माईक असतो. समोर कॅमेरामॅन शुटींग करत असतो.

यावेळी अचानक रस्त्यावरून धावत एक कुत्रा तिथे येतो. तो कुत्रा रिपोर्टरच्या अंगावर झेप घेतो आणि तिच्या हातातील माईक खेचतो. हा कुत्रा फक्त माईक खेचून थांबत नाही. तर तो कुत्रा रिपोर्टरच्या हातातील माईक घेऊन रस्त्यावर जोरजोरात धावू लागतो.

कुत्र्याच्या तोंडातील माईक घेण्यासाठी रिपोर्टर देखील त्याच्या मागे धावू लागते. रिपोर्टर खूप मेहनतीने कुत्र्याच्या तोंडातून आपला माईक सोडवून आणते. ही सर्व घटना लाईव्ह रिपोर्टिंग चालू असताना घडल्याने रिपोर्टरची चांगलीच फजिती झाली आहे.

ही न्यूज रिपोर्टर MN4 24 चॅनलची आहे. याविषयी चॅनेलने वृत्त दिल्यानंतर हा व्हिडीओ खूप वेगानं व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर लोक कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

दरम्यान, रशियातील एका पत्रकारानेच हा व्हिडीओ ट्विटरवरून शेअर केला आहे. 3 लाखांपेक्षा अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक केलं आहे. तुम्ही देखील हा व्हिडीओ नक्की पाहा.

महत्वाच्या बातम्या – 

राशीभविष्य : ‘या’ राशीच्या लोकांसाठी आहे आज भाग्याचा दिवस, नक्की वाचा

वाहह! अवघ्या 9 रुपयांत मिळेल घरगुती गॅस सिलिंडर, जाणून घ्या काय आहे भन्नाट ऑफर?

काय सांगता! मुख्यमंत्र्यांच्याच हेलिकॉप्टरला मारावा लागला धक्का; व्हिडीओ व्हायरल

‘पापा की परी रोड पर पडी’; भर रस्त्यात तरुणी स्कुटीवरुन दणकन आदळली, पाहा व्हिडीओ

आश्चर्यम! तीन पुरुषी लिंगांसह जन्माला आलं बाळ, जगभरातील डॉक्टर्स हैराण

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy