“इतर पक्षातील आमदार घेताना उकळ्या फुटत होत्या, बरं वाटत होतं, आता कसं वाटतंय?”

पुणे | सध्या राजकीय वर्तुळात अनेक महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. 2019ची विधानसभा निवडणुक झाल्यापासून भारतीय जनता पार्टीला राज्यात एकामागून एक धक्के सहन करावे लागत आहेत. 2019च्या निवडणुकीनंतर भाजपच्या अनेक बड्या नेत्यांनी पक्षाला राम राम ठोकत इतर पक्षात प्रवेश केले आहेत. यामुळे भाजपला मोठं खिंडार पडलं आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये भाजपचे अनेक आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे. राष्ट्रवादी नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही असा दावा केल्याचं बोललं जात होतं. मात्र, आता अजित पवार यांनी स्वतः या दाव्यासंबंधी महत्वाचं भाष्य केलं आहे. पुणे येथे अजित पवार आज बोलत होते.

यावेळी अजित पवार म्हणाले की, भाजपचे आमदार संपर्कात असल्याचं मी म्हटलं नाही. काळजी घ्या. तुम्ही मागच्या वेळी फोडाफोडी केली. सरकार येणार नाही आपली काम होणार नाहीत यासाठी ते नेते गेले. आता जर पुन्हा तिथे काम होणार नसतील तर पुन्हा ते दुसरीकडे जातील, असं मी म्हणलं आहे.

तीन चार महिन्यात काहीही होऊ शकतं. काहीही गोष्टी घडू शकतात, असं म्हटलं तर त्यांना राग आला. इतर पक्षातील आमदार घेताना त्यांना उकळ्या फुटत होत्या. बरं वाटत होतं. आता कसं वाटतंय गार गार वाटू लागलंय, असा टोलाही अजित पवार यांनी यावेळी विरोधकांना लगावला आहे.

तसेच सुरुवातीला देवेंद्र फडणवीस म्हणत होते मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. आता दुसरे म्हणतात मी परत जाईन. परत जाईन म्हणायला त्यांना कोणी पुणेकरांनी बोलावलंही नव्हतं.

निवडणूक कोणी कुठून लढवावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण एक वर्ष पूर्ण होण्याआधीच पुन्हा जाण्याची भाषा करू लागले. लोकांनी पाच वर्षांसाठी निवडून दिलं आहे. कोथरूडची काम व्हावीत ही अपेक्षा आहे. उद्या लोकं काम घेवून गेले तर मी परत जाणार आहे, असं सांगतील. मग आलेच कशाला कोल्हापूरलाच थांबायला हवं होतं, असा टोलाही अजित पवार यांनी यावेळी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे.

दरम्यान, राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येण्यापूर्वी अनेक नेत्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला राम राम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, अलीकडे आता पुन्हा एकदा राष्ट्रवादीत महाभारती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भाजपमध्ये गेलेले अनेक नेते येत्या काळात राष्ट्रवादीत  परततील, असे संकेत राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी दिले आहेत. येत्या काळात राष्ट्रवादीत मेगा भरती होणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

नवीन वर्षात प्रत्येक आठवड्याला वाढणार गॅस सिलिंडरचा दर? वाचा सविस्तर

तुम्हीही सोनं खरेदी करायचा विचार करताय का? वाचा आजचा दर

कॉंग्रेसच्या 18 नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश करताच राजकारण तापलं! ‘या’ बड्या नेत्याने दिला सावधानतेचा ईशारा

भाजपला मोठं खिंडार! आणखी एका बड्या महिला नेत्याची पक्षाला सोडचिठ्ठी

“मोदी सरकारने शेतकऱ्यांना न्याय तर दिलाच त्याबरोबर पैसा, उत्पादनाला हमीभाव आणि…”