सात फेरे घेताना नवरीच्या लेहंग्याला लागली आग अन्…, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | कोरोना काळापासून अनेक मुला-मुलींचे लग्नाचे बार उडले आहेत. कोरोना संसर्ग रोगामुळे सरकारने सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घातली होती. त्याचबरोबर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सर्व प्रकारचे कार्यक्रम केवळ एका ठराविक लोकांच्यात करण्याची परवानगी देण्यात आली होती.

आजकाल लग्नही एक ट्रेंडच झाला आहे. लग्नामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी पाहायला मिळतात. लग्न ठरल्यापासून ते नवरी नवऱ्याच्या घरी जातपर्यंत या दरम्यान अनेक प्रकारचे विधीही केले जातात. यातील अनेकजण प्रत्येक विधीचा फोटो नाहीतर ते करत असतानाचा व्हिडीओ आपल्या सोशल मीडियाच्या आकाऊंटवरून शेअर करत असतात.

आतातर इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रिल्सची नवी फॅडच निघाली आहे. नवरा-नवरींचेही रिल्स बनवून शेअर केले जाता. त्यामध्ये कधी-एकमेकांना हार घालताना. नाहीतर एकमेकांना घास भरवताना व्हिडीओ काढून त्याला साजेसं गाण लावून ते व्हिडीओ शेअर केले जातात.

अशातच एक लग्नातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये लग्नातील असून नवरा-नवरी लग्न मंडपामध्ये सात फेरे घेण्याची विधी करताना दिसत आहेत. हे करत असताना अचानक नवरीने घातलेल्या लेहंग्याला त्या होममधील आग लागते.

तेवढ्यात नवरदेवाच्या ही गोष्ट लक्षात येताच खाली वाकून होममधील आगीपासून नवरीचा लेहंगा बाजूला करतो. नवरदेवाच्या जागृकतेमुळे एक खूप मोठा अपघात टळला असल्याचं बोललं जात आहे.

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ ‘रिलेशनशिप गोल’ या यूजरने आपल्या इंस्टाग्राम आकाऊंवरून शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी नवरदेवाचे कौतुक केलं आहे. तर खूप जणांनी त्याच्या पाठीवर शाब्बासकेची थापही मारली आहे.

त्याचप्रमाणे या व्हिडीओला जवळजवळ आतापर्यंत 5 लाख लोकांनी लाईक केलं आहे. तसेच हा व्हिडीओ पाहून अनेकांनी कमेंट्सही केल्या आहेत.

https://www.instagram.com/reel/CRkzY5CjqA0/?utm_source=ig_embed&ig_rid=fdce9068-f84c-4902-ab24-63c63a04f539

महत्वाच्या बातम्या-

लाईव्ह मॅचमध्ये अचानक दोन वर्षाचा चिमुकला शिरला मैदानात अन्…, पाहा व्हायरल व्हिडीओ

माकडाशी पंगा घेणं तरूणाला पडलं महागात, पाहा व्हायरल व्हिडीओ

अभिनेता सचिन पिळगावकरांनी व्यक्त केली ‘ही’ खंत

भर मंडपात ब्राम्हणाने नवरीसोबत जे केलं ते पाहून तुम्हालाही बसेल धक्का, पाहा व्हिडीओ

बिबट्यानं हरणावर केला हल्ला अन्…, पाहा काळजाचं पाणी करणारा व्हिडीओ