काँग्रेसला धक्क्यावर धक्के बसत असताना राज्य शासनाकडून बाळासाहेबांना दिलासा

अहमदनगर : राजकारणातील कुशल डावपेचांसेबत सहकार क्षेत्रातील कामाबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात ओळखले जातात. ‘सहकारनिष्ठ’ हा राज्य शासनाचा पुरस्कार संगमनेरच्या थोरात सहकारी कारखान्याला जाहीर करण्यात आला आहे.

लोकसभा निवडणुकीत देशासह राज्यात काँग्रेसचा मोठा पराभव झाला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला ‘अच्छे दिन’ आणण्यासाठी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

काँग्रेस पक्षातील आऊटगोईंगमुळे थोरात काहीसे बँकफुटवर गेले आहेत. या घडामोडींनंरत सरकारने थोरात यांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या कारखान्याला सहकारनिष्ठ पुरस्कार जाहीर दिल्याने त्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे अत्यंत निष्ठावंत नेते मानले जातात. राज्यातल्या सहकार चळवळीत त्यांचे मोठे योगदान आहे. मराठा समाजाचे मातब्बर नेते, गांधी घराण्याचे विश्वासू अशीही त्यांची ओळख आहे. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी सलग सात वेळा विक्रमी मताधिक्याने विजय मिळवला आहे.

दरम्यान, अहमदनगरच्या विखे पाटील घराण्याचे ते कट्टर विरोधक मानले जातात. त्यामुळे विखे पाटील यांना शह देण्यासाठीही काँग्रेसने बाळासाहेब थोरात यांच्याकडे नेतृत्त्व दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या-