झूम मिटिंग सुरू असताना अचानक कॅमेरा सुरू झाला अन् शिक्षकाचं बेडवरील कृत्य सर्वांसमोर आलं

नवी दिल्ली | कोरोना महामारीमुळे अनेक गोष्टी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आल्या आहेत. विद्यार्थ्यांचे वर्ग, ऑफिसमधील मिटिंग्ज, शिक्षकांचे प्रशिक्षण सर्व काही ऑनलाईन सुरु आहे. या काळात झूम मिटिंगचा वापर अधिक वाढला आहे. मात्र, लाईव्ह झूम मिटिंग दरम्यानच्या नको त्या अनेक गोष्टी सोशल मीडियावर गेल्या दोन वर्षात समोर आल्या.

सध्या सोशल मीडियावर लाईव्ह मिटिंग दरम्यान एका शिक्षकाने केलेल्या कृत्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. शिक्षकांची ऑनलाईन मिटिंग सुरू असताना अचानक एका शिक्षकाचा कॅमेरा सुरू झाला आणि चालू मिटिंगमधील त्याचं पार्टनरसोबतच कृत्य सर्वांसमोर उघड झालं.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ कॅरेबियन देश जमेकातील असल्याचं बोललं जातं आहे. जमेका टीचर्स असोसिएशनने सर्व शिक्षकांची एक झूम मिटिंग आयोजित केली होती. जमेकातील शिक्षकांसह काही शैक्षणिक अधिकारी देखील या मिटींगला उपस्थित होते.

या मिटिंगमध्ये कोरोनाकाळात शिक्षकांसमोर आलेल्या अडचणी या गोष्टींवर चर्चा चालू होती. सर्व शिक्षक यावेळी लक्षपूर्वक ऐकत होते. मात्र, लाईव्ह मिटिंग दरम्यान अचानक एका शिक्षकाचा कॅमेरा सुरू झाला आणि त्याचं आपल्या पार्टनरसोबतचं कृत्य सर्वांसमोर उघड झालं.

लाईव्ह मिटिंग सुरू असताना अचानक एका शिक्षकाचा कॅमेरा सुरू झाला आणि मिटिंगमध्ये या शिक्षकाचं बेड दिसू लागला. हा शिक्षक मिटिंग चालू असतानाच आपल्या पार्टनरसोबत इंटिमेट होत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसलं.

यामुळे लाईव्ह मिटिंगमध्ये मोठा गोंधळ उडाला. जवळपास दोन मिनिटं हे सर्व सुरू होतं. सर्वजण शिक्षकाचं ते कृत्य पाहत होते. कदाचित त्या शिक्षकाला कॅमेरा सुरू असल्याची जाणिव नव्हती.

दरम्यान, संबंधित शिक्षकावर कारवाई करण्यात आली की नाही, हे अद्याप समोर आलं नाही. मात्र, सध्या जगभरात या शिक्षकाच्या कृत्याची चर्चा रंगली आहे.

महत्वाच्या बातम्या-

वरुण धवन ठाकरे सरकारवर संतापला, व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

मी खूपच रोमॅन्टिक आहे, मला 3-4 मुलांची तरी आई व्हायचंय – भूमी पेडणेकर

रणवीर आणि आलियाचा कीस करतानाचा ‘तो’ फोटो व्हायरल

नवरदेवाला पाहताच नवरी मंडप सोडून रस्त्यावर पळाली अन्…; पाहा व्हिडीओ

‘डिंपल लग्न करणार नाही तिला विक्रमच्या..’; शेरशाह विक्रम बत्रांच्या वडिलांचा खुलासा