धोनीचं करियर कोणी संपवलं?, चहलनं सांगितलं नेमकं कारण; म्हणाला…

मुंबई | भारताच्या क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने 15 ऑगस्टला आपली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. रात्री साडेसातच्या सुमारास धोनीने इन्स्टाग्रामवर निवृत्तीसंदर्भात पोस्ट केली होती. धोनीने अचानक घेतलेल्या या निर्णयाने चाहते खूप निराश झाले. अशातच भारताचा फीरकीपटू युजवेंद्र चहलने धोनीचं करियर कोणी संपवलं?, याबाबत खुलासा केला आहे.

महेंद्रसिंग धोनीचे करियर हे सध्या जगात थैमान घातलेल्या कोरोना विषाणुने संपवलं आहे. कारण कोरोना वायरस नसता तर धोनीने  टी-20 विश्वचषक खेळला असता, असं चहलने म्हटलं आहे. एका टीव्ही शोमध्ये तो बोलत होता.

धोनी मला मोठ्या भावाप्रमाणे आहे. कारण धोनी जेव्हा मैदानावर असतो तेव्हा मला आणि कुलदीपला खूप आधार असतो. आमचं 50 टक्के काम तो करत असतो. खेळपट्टी पाहताक्षणी धोनीला खेळपट्टीचा अंदाज येतो आणि तेच आम्हाला समजण्यासाठी 2 षटकं टाकून झाली की येत असल्याचं चहलने सांगितलं.

दरम्यान, कोणताही सामना असला तर धोनी हा यष्टीमागून गोलंदाजाला नेहमी काहीना काही सल्ला देत असतो आणि त्याचा फायदाही गोलंदाजाला होतो. कितीतरी व्हिडीओ आहेत की ज्यामध्ये धोनी स्टंपच्या मागे असताना गोलंदाजाला चेंडू कुठे आणि कसा टाक हे सांगतो आणि त्या चेंडूवर गोलंदाज बळी घेतो. त्यामुळे धोनीने निवृत्ती घेतल्यामुळे यष्टीरक्षकाची कमी संघाला जाणवणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘आता ठाकरे सरकारची दादागिरी संपली, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा’; भाजपचा आक्रमक पवित्रा

“सलमान खान आणि करण जोहर या दोघांनी सुशांतला सिनेमे मिळू दिले नाहीत”

सुशांतसिंग प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवल्यावर अंकिता लोखंडे म्हणाली…

महेश भट यांचं रियासोबतचं ‘ते’ दृश्य पाहून नेटकरी संतापले; पाहा व्हिडीओ

राऊतांनीच सुशांतची केस सीबीआयकडे जाण्यासाठीचं काम सोप्प केलं आता तेच तोंडावर पडलेत- नारायण राणे