Top news महाराष्ट्र मुंबई

काळजी घ्या! ‘कोरोनामुक्त झालेल्यांना…’; WHO ने दिली ‘ही’ महत्वाची माहिती

corona11

मुंबई | महाराष्ट्रात (Maharashtra ) कोरोना (Corona) आणि ओमिक्रॉन (Omicron) वेरियंटचे रुग्ण वाढत असल्याचं समोर आलं आहे. राज्यात कोरोनाचा कहर (Corona Outbreak) सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना पुन्हा डोकं वर काढू लागला आहे. एकीकडे रुग्ण संख्या वाढत आहे तर दुसरीकडे तिसरी लाट येण्याची शक्यता आहे.

दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची (Corona Patients) संख्या झपाट्याने वाढतेय. राज्यातील कालचा आकडा तर चिंता अधिक वाढवणारा आहे. राज्यात शुक्रवारी दिवसभरात 40 हजार 925 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. अशात ओमिक्रॉनबाबत एक चिंताजनक माहिती समोर आली आहे.

कोरोना होऊन बऱ्या झालेल्या व्यक्तींमध्ये नैसर्गिक अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत, मात्र ओमिक्रॉन वेरिएंट या अँटीबॉडीजना भेदून शरीरात प्रवेश करू शकतो. म्हणजे, याआधी कोविडची (Covid-19) लागण झालेल्यांनाही पुन्हा ओमिक्रॉनची (Reinfection of Omicron) लागण होऊ शकते. अशा व्यक्तींना डेल्टाच्या तुलनेत ओमिक्रॉनची लागण होण्याची शक्यता अधिक असल्याचं WHO ने म्हटलं आहे.

भारतातल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला कारणीभूत ठरलेल्या डेल्टाएवढा ओमिक्रॉन घातक नाही. डेल्टा वेरिएंटचा (Delta Variant) जेवढा गंभीर परिणाम आपल्या फुफ्फुसांवर होत होता, तेवढा ओमिक्रॉनमुळे होत नाही, असं ते म्हणालेत.

अमेरिका आणि जपानी वैज्ञानिकांच्या एका ग्रुपने उंदीर आणि हॅम्स्टरवर (Hamster) केलेल्या प्रयोगातून हे सिद्ध झालं आहे. बेल्जियममधल्या संशोधकांनी हॅम्स्टर्सवर केलेल्या प्रयोगातूनही ही बाब अधोरेखित झाली आहे. त्यामुळे ओमिक्रॉनची लागण झाल्यानंतर रुग्णालयात भरती करावं लागण्याची शक्यता अगदीच नगण्य आहे. असं असलं, तरी गाफील न राहता खबरदारी बाळगणं गरजेचं आहे, असं WHO ने म्हटलंय.

गेल्या दोन वर्षांपासून जगभरात सुरू असलेलं कोरोना महामारीचं (Corona Pandemic) संकट पुन्हा गडद होत आहे. सध्या कोरोना विषाणूच्या ‘ओमायक्रॉन’ (Omicron) या नवीन व्हॅरिएंटची दहशत पसरली आहे. ओमिक्रॉनबाबत जगभरातून भीतिदायक आकडेवारी समोर येऊ लागली आहे.

भारतातही ओमायक्रॉनचा शिरकाव झाला आहे. कोरोनाची लस घेतलेल्या ओमिक्रॉन रुग्णांची स्थिती जास्त गंभीर होत नसली, तरी बहुतेकशा लशी (Covid-19 Vaccine) ओमायक्रॉनविरुद्ध जास्त प्रभावी ठरत नसल्याची बाब प्राथमिक संशोधनातून निदर्शनास आल्यानं चिंता वाढली आहे.

दरम्यान,अशा स्थितीमध्ये मास्क (Mask) वापरणं, सॅनिटायझर वापरणं, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं यांसारख्या सुरक्षा उपायांचं (Safety measures) पालन करण्याचे सल्ले वारंवार मिळत आहेत.

महत्वाच्या बातम्या- 

लॉकडाऊनबाबत राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले… 

‘ती’ पुन्हा येतेय…, टाटाची जबरदस्त कार लवकरच येणार बाजारात 

लस न घेतलेल्यांसाठी धोक्याची घंटा, मुंबईतून आली ‘ही’ धक्कादायक माहिती समोर

लांबसडक केसांसाठी करा फक्त ‘हे’ घरगुती उपाय, केसगळतीही थांबणार

झटपट वजन कमी करायचंय? मग हिवाळ्यात भाकरी खा… होतील फायदेच फायदे