नवी दिल्ली | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी (Finance Minister Nirmala Sitharaman) यंदाचा अर्थसंकल्प (Union Budget 2022 ) सादर केला. कोरोना संसर्गाच्या काळातील हा दुसरा अर्थसंकल्प आहे.
अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सामान्यांना पडणारा सर्वांत महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आपल्या खिशावर किती भार पडणार? कोणत्या वस्तू महाग होतील आणि कोणत्या स्वस्त होणार आहेत?. निर्मला सीतारमन यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात कोणत्या वस्तू महाग झाल्या आहेत आणि कोणत्या स्वस्त हे पाहूया.
मोबाईल फोन, चार्जर, कॅमेरा लेन्स आदी इलेक्ट्रीक वस्तूंसह कपडे आणि चामड्याच्या वस्तू स्वस्त होणार आहेत. त्यामुळे सर्व सामान्यांना दिलासा मिळाला आहे.
यंदाच्या बजेटमध्ये कररचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे नोकरदारांच्या पदरी निराशा आली आहे. मात्र या अर्थसंकल्पामध्ये काही वस्तू सामान्यांसाठी स्वस्त झाल्या आहेत.
आजच्या अर्थसंकल्पामध्ये इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन ऐवजी बॅटरी स्वॅपिंग धोरण राबवणार असल्याच सांगितलं तसंच येत्या काही वर्षात जवळपास 60 लाख नोकऱ्या निर्माण करण्याच सरकारच उद्दीष्ट असल्याचंही अर्थमंत्र्यांनी (Union Minister Nirmala Sitharaman) सांगितलं.
काय स्वस्त झालं?
LTCG वर 15% पेक्षा जास्त कर नाही, कापड स्वस्त होईल, लेदर स्वस्त होईल, परदेशातून येणाऱ्या मशिन्स स्वस्त होतील,
,शेतीचे साहित्य स्वस्त होईल, मोबाईल आणि चार्जर स्वस्त होतील, जीएसटीमध्ये खूप सुधारणा होईल, केंद्राच्या बरोबरीने राज्य कर्मचाऱ्यांना NPS मध्ये सूट, कटलेले आणि पॉलिश केलेले हिरे, रत्ने यांच्यावरील सीमाशुल्क 5 टक्के करण्यात येईल. को-ऑपरेटिव्ह सरचार्ज 12 टक्क्यांवरून 7 टक्के करण्यात येणार आहे.
काय महागलं?
विदेशी छत्री महाग, इमिटेशन ज्वेलरीवर प्रति किलो 400 रुपये कस्टम ड्युटी लागणार, भांडवली वस्तूंवरील सूट संपणार, आयकर स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही, 350 हून अधिक कस्टम ड्युटी सवलती रद्द केल्या जातील.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या सामाजिक सुरक्षा लाभांत मदत करण्यासाठी आणि त्यांना केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने
आणण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कर कपातीची मर्यादा 10% वरून 14% करण्यात येईल.
सरकारने आभासी चलनातून (क्रिप्टोकरन्सी) कमाईवर मोठा कर लावण्याची घोषणा केली आहे. क्रिप्टो चलन कराच्या जाळ्यात
आणलं जाईल आणि त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर 30 टक्के कर आकारला जाईल.
महत्वाच्या बातम्या-
क्रिप्टोकरन्सी विकत घेणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; मोदी सरकारने केली मोठी घोषणा
Budget 2022 | विद्यार्थ्यांसाठी अर्थसंकल्पात मोदी सरकारने केल्या ‘या’ महत्वाच्या घोषणा
Budget 2022 | ‘इतके लाख नवे रोजगार निर्माण करणार’; अर्थमंत्री निर्मला सितारमण यांची मोठी घोषणा
Budget 2022 | देशाची अर्थव्यवस्था सावरतेय, सामान्यांना दिलासा देण्याचा आमचा प्रयत्न- निर्मला सितारमण
सर्वसामान्यांना बसू शकतो सर्वात मोठा झटका; ‘या’ गोष्टी महागणार?