“सगळं ठरलं होतं… मंत्रिपदही ठरलं होतं, पण ऐनवेळी शरद पवारांनी…”

पुणे | राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी घेतलेल्या पहाटेच्या शपथविधीची चर्चा आजही सुरू आहे. पहाटेच्या शपथविधीसंदर्भात अनेक अनुत्तरीत प्रश्नांबाबत राजकीय नेते गौप्यस्फोट करत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांनी एका मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीविषयी वक्तव्य केलं होतं. तसेच शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्ता स्थापनेची ऑफर दिल्याचंही सांगितलं. त्यावरून आता राज्यातील भाजप नेते शरद पवारांना प्रत्युत्तर देत आहेत.

त्यातच भाजप नेते गिरीष महाजन (Girish Mahajan) यांनी शरद पवार हे अर्धसत्य सांगत आहेत. शरद पवारांनी पुर्ण सत्य सांगावं, असं म्हटलं आहे.

भाजप (BJP) आणि राष्ट्रवादीने (NCP) एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याबाबत सर्व चर्चा झाली होती. दिल्लीत भाजपचे वरिष्ठ नेते आणि शरद पवार यांच्या बैठका झाल्या होत्या, असं गिरीष महाजन यांनी म्हटलं आहे.

एवढेचं नाही तर या बैठकीमध्ये कोणाला कोणतं मंत्रिपद द्यायचं हेही ठरलं होतं. मात्र, ज्यावेळेस काँग्रेस (Congress) शिवसेनेसोबत (Shiv Sena) यायला तयार झाली तेव्हा शरद पवारांनी शब्द फिरवला, असा आरोप गिरीष महाजन यांनी केला आहे.

यावेळी गिरीष महाजन यांना अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात काय चर्चा झाली असा प्रश्न केला होता. पहाटेच्या शपथविधीला मी होतो. परंतु, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात काय चर्चा झाली हे मला माहिती नाही, असं गिरीष महाजन यांनी सांगितलं.

शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यांवर चंद्रकांत पाटील यांनी देखील टीका केली आहे. मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. शरद पवार यांना मी प्रश्न विचारेन हे सांगायला तुम्हाला इतके महिने का लागले? तुमचा इतिहास खरं न बोलण्याचा आहे, असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे.

मोदी यांनी ऑफर दिल्यावर तुमची धावत जाण्याची परंपरा आहे. त्यामुळे तुम्ही थांबलात का? हा मोठा प्रश्न आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

शरद पवार यांनी लोकसत्ता या वर्तमानपत्राच्या मुलाखतीमध्ये पंतप्रधानांशी 2019 मध्ये काय संभाषण झालं, याबाबत खुलासा केला. आमची भूमिका वेगळी आहे. त्यामुळे तुम्हाला अंधारात ठेवायचं नाही, असं मी स्वत: त्यांच्या कार्यालयात भेटून सांगितलं होतं.

तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर पुन्हा एकदा विचार करावा, असं सांगितलं होतं. शिवसेनेशी फारकत घेतल्यानंतर भाजपला राष्ट्रवादीची गरज भासू शकते, असंही शरद पवार यांनी सांगितलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या- 

भाजप खासदार म्हणतात,”नाईट कर्फ्यू आणि लाॅकडाऊन हा बोगसपणा, लग्न समारंभात…”

 नाशकात ‘दंगल’… बारकाल्या पोरींची कॉलेजमध्ये तुफान हाणामारी, पाहा व्हिडीओ-

मोठी बातमी! नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळला, कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता

 ‘…तर महाराष्ट्रात लॉकडाऊन लावावा लागेल’; गृहमंत्र्यांचं मोठं वक्तव्य

नितेश राणे यांना धक्क्यावर धक्के! सहकार विभागाकडून मोठी कारवाई