“कोण आदित्य ठाकरे, तो फक्त एक आमदार आहे”

पुणे | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्याचवेळी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचा देखील पुण्यात शक्तीप्रदर्शनाचा कार्यक्रम आहे. आदित्य ठाकरे यांचा ज्या ठिकाणी कार्यक्रम आहे तेथून जवळच शिवेसेनेचे बंडखोर आमदार तानाजी सावंत यांचे निवासस्थान आहे.

यावेळी त्यांच्यासोबत माध्यामांनी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, कोण आदित्य ठाकरे? तो केवळ एक आमदार आहे, असा आदित्य ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

तसेच सर्व शक्ती निघून गेल्यावर आता शक्तीप्रदर्शन करण्यात काय अर्थ आहे, असा प्रश्न देखील यावेळी तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी केला. सर्व शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचे सावंत म्हणाले.

तानाजी सावंत हे शिंदे गट स्थापनेत पुढारी होते. शिवसेनेत बंड करणाऱ्या नेत्यांचे ते म्होरके होते. त्यामुळे पुण्यातील त्यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली होती.

मात्र ही तोडफोड शिवसैनिकांनी नाही तर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकांनी केल्याचा दावा सावंत यांनी केला होता. तसेच ते कोणाशी पंगा घेत आहेत, याचा त्यांनी विचार करावा, असा इशारा देखील त्यांनी राष्ट्रवादीला दिला होता.

मुख्यमंत्री आज पुणे दौऱ्यावर आहेत. ते पुण्यातील नागरिकांच्या समस्या जाणून घेणार आहेत. तसेच त्यांचे देखील आदित्य ठाकरे यांच्या विरोधात शक्तीप्रदर्शन होणार आहे. यावेळी तानाजी सावंत देखील आपली ताकद आजमावणार आहेत.

आदित्य ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत तानाजी सावंतांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे हे आजच्या आपल्या पुण्यातील शक्तीप्रदर्शनात त्यांचा कशाप्रकारे समाचार घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

भागवतांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया, म्हणाले ‘मोहन भागवत मला आदर्श आहेत’

‘लायकी नसणाऱ्या राजकारण्यांच्या हातात देश दिलाय’, अभिनेता सुबोध भावेचं मोठं वक्तव्य

‘शरद पवारांचा खाकस्पर्श’, भाजप नेत्याच्या ट्विटने चर्चांना उधाण

मोठी बातमी! संजय राऊतांच्या ईडी कोठडीत वाढ

‘चाळीसच्या चाळीस आमदारांनी राजीनामा द्या, मग बघू…’, आदित्य ठाकरेंचं बंडखोर आमदारांना आव्हान