खेळ

सर्वात लोकप्रिय क्रिकेटपटू कोण??? सर्व्हेतून समोर आली धक्कादायक माहिती…

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटपटूंमध्ये तुमचा आवडता खेळाडू कोण? असा प्रश्न जर तुम्हाला विचारला तर तुमचं उत्तर काय असेल??? सचिन तेंडुलकर, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी किंवा अन्य कोणीही असू शकतो. मात्र भारतात सर्वात लोकप्रिय खेळाडू ठरण्याचा मान मिळालाय महेंद्रसिंग धोनीला.

सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीसारख्या दिग्गज खेळाडूंना मागं टाकत त्याने हा मान पटकावला आहे. 

सर्वाधिक लोकप्रिय क्रिकेटपटू ठरवण्यासाठी नुकताच एक सर्व्हे करण्यात आला होता. या सर्व्हेतून ही माहिती समोर आली आहे. धोनीची लोकप्रियता पाहता यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट नाही. 

या सर्व्हेतून आणखी एक आश्चर्यचकीत करणारी बाब समोर आली आहे. तरुणांसोबतच धोनी तरुणींमध्येही प्रचंड लोकप्रिय असल्याचं या सर्व्हेतून समोर आलं आहे.

IMPIMP