शिंदेंच्या मंत्रिमंडळात सगळेच कोट्यधीश; जाणून घ्या सर्वात श्रीमंत मंत्री कोण?

मुंबई | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सरकारचा मंगळवारी मंत्रिमंडळ विस्तार झाला. यावेळी शिवसेनेतील बंडखोर नऊ आमदार आणि भाजपचे नऊ यांचा शपथ विधी झाला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी अठरा मंत्र्यांना यावेळी शपथ दिली.

महाविकास आघाडी सरकारमधील वादग्रस्त मंत्री, संजय राठोड (Sanjay Rathod) यांना देखील नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले. संजय राठोड यांच्यावर पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी आरोप झाले होते. त्यांना त्यावेळी मंत्रिपदावरुन देखील पायउतार व्हावे लागले होते.

तसेच शपथविधी झालेल्या 18 मंत्र्यांपैकी 70% आमदारांवर राजकीय आणि फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. 12 कॅबिनेट मंत्र्यांतर अपराधी स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

नव्या मंत्रिमंडळातील एक मंत्री 10 वी पास आहे, तर इतर पाच जण 12 वी पास आहेत. एक अभियंता आहे, 7 पदवीधर, 2 पदवुत्तर शिक्षण घेतलेले आहेत. एकाने डॉक्टरेट मिळवली आहे.

यातील सर्व मंत्री कोटयधीश आहेत. यातील सर्वाधीक श्रीमंत मंत्री मलबार हिलचे भाजपचे आमदार आणि पहिल्यांदा मंत्री झालेले मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) हे आहेत. लोढा हे व्यवसायाने बांधकाम व्यावसायिक आहेत.

तर सर्वात कमी संपत्ती असलेले आमदार संदिपान भुमरे (Sandeepan Bhumare) आहेत. भुमरे यांच्याकडे 2 कोटी रुपये एवढी सर्वात कमी संपत्ती आहे. भुमरे हे पैठणचे आमदार आहेत. ते गेली 35 वर्षे शिवसेनेत होते.

सर्वात श्रीमंत मंत्री लोढा यांच्या नावावर पाच गुन्हे दाखल आहेत. तर संजय राठोड यांच्यावर वादग्रस्त पूजा चव्हाण आत्महत्या (Pooja Chavan Suicide Case) प्रकरण होते. त्यातून त्यांना क्लिन चीट मिळाली होती.

महत्वाच्या बातम्या –

‘हे अत्यंत दुर्देवी’, संजय राठोडांना मंत्रिपद मिळताच चित्रा वाघ संतापल्या

शरद पवार, सुप्रिया सुळेंसह अजित पवारांनाही सर्वोच्च न्यायालयाचा दणका

एकीकडे शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, तर दुसरीकडे विनायक राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

मोठी बातमी! ज्येष्ठ मराठी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन

पीव्ही सिंधूने रचला इतिहास; भारतासाठी गोल्ड मेडल जिंकलं