मुंबई | भारतीय स्टार फलंदाज विराट कोहलीने काल कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. काल विराटने कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता विराट कर्णधारपदाच्या सर्व जबाबदारीतून मोकळा झाला आहे.
विराटने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता अनेकजण त्यावर प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी विराटच्या या निर्णयाचं स्वागत केलं तर अनेकांनी लवकर निर्णय घेतल्याचं बोलून दाखवलं.
भारताच्या अनेक माजी दिग्गज खेळाडूंनी देखील यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशातच आता लिटल मास्टर सुनिल गावसकर यांनी देखील विराटच्या निर्णयावर आश्चर्यचकित नसल्याचं म्हटलं आहे.
मला विराटच्या राजीनामा देण्याच्या निर्णयाचं अजिबात आश्चर्य वाटलं नाही. खरंतर सामना संपल्यानंतर प्रेझेंटेशन सेरमनी होते, तेव्हा विराट राजीनामा देईल, असं मला वाटलं होतं, असं सुनिल गावसकर म्हणाले आहेत.
सामना संपल्यावर विराटने हा निर्णय जाहीर केला असता, तर कुठल्यातरी रागातून हा निर्णय घेतलाय, असा संदेश गेला असता. त्यामुळे विराट 24 तास थांबला व त्यानंतर त्याने हा निर्णय जाहीर केला, असंही गावसकर म्हणाले.
परदेशात मालिका गमावल्यानंतर कर्णधाराला पदावरुन हटवण्याचा धोका असतो. आधी सुद्धा हे घडलं असल्याचं त्यांनी सांगितलं. कदाचित मालिका गमावल्याने त्याला कर्णधारपद जावू शकतं याचा अंदाज होता, असंही गावसकर म्हणाले आहेत.
त्याचबरोबर विराट नंतर आता कर्णधारपद कोणाकडं जाईल, असा सवाल आता विचारला जात आहे. त्यावर देखील लिटिल मास्टर यांनी उत्तर दिलं आहे.
24 वर्षांच्या ऋषभ पंतनं मला प्रभावित केलं आहे. त्याच्यावर कसोटी संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते, असं वक्तव्य सुनील गावसकर यांनी केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; अंगावर काटा आणणाऱ्या घटनेचा व्हिडीओ सीसीटीव्हीत कैद
शाळा सुरू करण्यासंदर्भात राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
“दुधातील माशी प्रमाणे मित्रपक्षांनी बाजूला फेकलं”
शॅाकिंग… राजीनामा विराट कोहलीचा; हादरा बसला रोहित शर्माला!
शेतात रहायला गेलेल्या सलमानचं शेजाऱ्यासोबत भांडण, या कारणामुळे खटला दाखल