खलनायक ठरलेले मौलाना साद कोण आहेत? त्यांना एवढा मान का? वाचा संपूर्ण माहिती

नवी दिल्ली |  देशात कोरोनामुळे भीतीचं वातावरण असताना तबलीग जमात आणि मरकज चर्चेचा विषय ठरला आहे. याच जमातीच्या एका मौलवींचा एक ऑडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. मरण्यासाठी मशिदीपेक्षा चांगली जागा नाही, असं वक्तव्य मरकजचे अध्यक्ष मौलाना साद यांनी केलं आहे. म्हणूनच आता त्यांच्याकडे खलनायक म्हणून पाहिलं जाऊ लागलं आहे.

मौलाना साद यांचं पूर्ण नाव मुहम्मद लाद कंधलावी. ते सुन्नी मुस्लिमांचे सर्वात मोठी संघटना असलेल्या तबलीघी जमातीचे संस्थापक मुहम्मद इलियास कंधलावी यांचे पणतू आहेत.

तबलीघी जमातीचे माजी अमीर मौलाना जुबैर उल हसन यांनी संघटनेच्या नेतृत्वासाठी सुरू समितीची स्थापना केली होती. त्यानंतर साद यांनी स्वत:ला अमीर घोषित केले. याच कारणामुळे साद यांना विरोध सुरू झाला. मात्र, जुबैर यांचा मृत्यू झाल्यानंतर मौलाना साद यांनी कुणालाही विश्वासात न घेताच स्वत:ला सर्वेसर्वा घोषित केले. मौलाना साद हे जमातीच्या संस्थापकाचे पणतू आणि जमातीच्या दुसऱ्या अमीरचे नातू असल्याने जमातील लोकांची त्यांच्यावर श्रद्धा कायम होती.

आता आताच त्यांनी अकलेचे तारे तोडले आहेत. मशिदीमध्ये जमा होण्यानं आजार होईल, हा विचारही मूर्खपणाचा आहे. अल्लाहवर विश्वास ठेवा. कुराण वाचत नाहीत आणि वर्तमानपत्रं वाचतात आणि घाबरून पळत सुटतात. अल्लाह यासाठीच काहीतरी अडचणी निर्माण करतो, कारण त्याला पाहायचं असतं की अशा परिस्थितीत माझा बंदा काय करतो?, असं वक्तव्य मौलाना साद यांनी केलं आहे.

दरम्यान, मौलाना साद यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी साथीचे आजार अधिनियम 1897 आणि भारतीय दंड विधान लमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मौलाना साद हे फरार आहेत.

महत्वाच्या बातम्या –

-माझा नवराच मला समलैंगिक समजत होता- सनी लिओनी

-रैनाने दिलेल्या मदतनिधीवर पंतप्रधान मोदी म्हणाले…

-आता चिंता अधिक वाढली; कोरोनामुळे 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू

-“कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशात आणीबाणी लागू करावी”

-निजामुद्दीन ‘मरकज’साठी गेलेल्या राज्यातील लोकांनी स्वतःहून समोर यावं- अनिल देशमुख