टीम इंडियाचा नवा Test Captain कोण?, सौरव गांगुलीने स्पष्टचं सांगितलं

मुंबई | मागील काही दिवसांपासून बीसीसीआय (BCCI) आणि विराट कोहली (Virat kohli) यांच्यात वाद पेटल्याचं पहायला मिळालं होतं. त्यानंतर विराट कोहलीने एकामागून एक सर्व जबाबदाऱ्यातून हात झटकले.

दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेनंतर विराट कोहलीने अचानक कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली होती. अशातच आता विराट कोहलीनंतर टीम इंडियाचा नवा कॅप्टन कोण असणार याची सर्वत्र एकच चर्चा सुरू आहे.

अशातच आता बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी याच मुद्द्यावर बोलताना महत्त्वाचं वक्तव्य केलंय. त्यावेळी थेट कोणत्याही खेळाडूचं नाव न घेता त्यांनी सुचक संकेत दिले आहेत.

आम्ही कर्णधारपदासाठी काही मापदंड ठेवले आहेत. जो यात फिट बसेल, तो भारतीय टेस्ट टीमचा पुढचा कर्णधार असेल, असं गांगुलेने म्हटलंय.

निवड समितीच्या डोक्यात एकादं नाव असेल, ते बीसीसीआय अधिकारी, अध्यक्ष आणि सचिव यांच्यासोबत चर्चा करतील, मग त्यानंतरच नाव घोषित होईल, असंही गांगुलीने सांगितलं आहे.

बीसीसीआय आणि विराट कोहली या वादावर विचारलं असता गांगुलीने कोणतंही उत्तर देण्यास नकार दिला आहे. तसेच बीसीसीआय अध्यक्ष म्हणून गेल्या काही दिवसांमध्ये गंभीर आरोप झाले होते. गांगुलीने हे आरोप फेटाळून लावले आहेत.

दरम्यान, पुढील महिन्यात टीम इंडियाच्या नव्या कर्णधाराच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. भारताचा एकदिवसीय आणि टी ट्वेंटी कर्णधार रोहित शर्मा याच्या नावाची चर्चा सुरू आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

“मला फक्त मुंबईत येऊ द्या, मग मी बघतो काय करायचं ते”

“देशात पाॅर्न इंडस्ट्री बनू नये, तुम्ही मला बोल्ड म्हणत असाल तर…”

शेअर मार्केटमध्ये पैसे लावणाऱ्यांनो…’हे’ काम करा नाहीतर डीमॅट अकाऊंट बंद होईल

रोहित शर्माचं टेन्शन वाढलं! टीम इंडियाचा ‘हा’ मॅच विनर फिटनेसमुळे अडचणीत

आमदार नितेश राणेंची अचानक तब्येत बिघडली, वकिलांची धावपळ सुरू