मुंबई | राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्यात चांगलाच कलगीतूरा रंगलेला आहे. सध्या दोन्ही नेतेे एकमेकांवर जोरदार टीका करत आहेत.
मुंबईतील ड्रग्ज प्रकरणावरून सुरू झालेला हा गोंधळ सध्या सर्व देशात गाजत आहे. नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून फडणवीस यांच्यावर जोरदार आरोप केले होते.
देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांना फडणवीस यांच्याकडूनही पत्रकार परिषदेच्या माध्यामातून जोरदार प्रत्युत्तर मिळालं. यानंतर आज मलिक यांनी पत्रकार परिषद घेत फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
नवाब मलिक यांनी फडणवीस यांच्यावर आरोपींना पाठीशी घातल्याचा आरोप केला होता. यावर फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विटच्या माध्यमातून मलिक यांच्यावर जोरदार टीका केली होती.
अमृता फडणवीस यांच्या टीकेला मलिक यांनी उत्तर दिलं आहे. वांद्रे येथील 200 कोटींचा फ्लॅट कोणाचा आहे, याचं उत्तर फडणवीस यांनी राज्याला द्यावं असं मलिक म्हणाले आहेत.
माझ्यावर अमृता फडणवीस यांनी आरोप केले आहेत पण मी कोणत्याही महिलेला उत्तर देणार नाही, असंही मलिक म्हणाले आहेत. परिणामी फडणवीस आणि मलिक यांच्यातील वाद वाढत जाण्याची चिन्हं आहेत.
बेनामी संपत्तीवरून सध्या दोन्ही नेत्यांमध्ये वाद रंगला आहे. बीकेसीमधील फ्लॅट कोणाला रहायला दिला आहे, असा सवाल मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचं म्हटलं होतं. यावर मलिक यांनी रियाज भाटी या व्यक्तीचं नाव घेत फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असताना राज्यात अनेक गुंडांना अभय देण्यात आल्याचं मलिक म्हणाले आहेत. फडणवीस राज्याचे 2014 ते 2019 मध्ये मुख्यमंत्री पदासोबतच गृहमंत्री होते.
दरम्यान, एनसीबीच्या कारवाईवरून राज्यात सध्या या दोन्ही नेत्यांमध्ये वाद पेटला आहे. मलिक यांनी फडणवीस यांच्यावर टीका केल्यानं भाजपकडून जोरदार टीका केली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
मंत्री झालो पण, कोणी नामदार म्हणतच नाही- रावसाहेब दानवे
‘या’ मल्टीबॅगर स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं मालामाल; 10 हजारांचे झाले इतके कोटी
आम्ही आमचं म्हणणं राज्यपालांकडे मांडलं, सत्याचाच विजय होईल- क्रांती रेडकर
“इंदोरीकर महाराज लस घेत नाहीत, तोपर्यंत त्यांचं कीर्तन होऊ देऊ नका”
कोरोनानंतर आता ‘या’ विषाणूचं सावट! युरोपातील अनेक देशात चिंतेचं वातावरण