“गृहमंत्र्यांना कोण देतंय 100 कोटी? मीही गृहमंत्री होतो”

मुंबई | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा ताबा सीबीआयने (CBI) घेतला आहे. आर्थर रोड जेलमधून सीबीआय अधिकाऱ्यांनी देशमुख यांना ताब्यात घेतलं आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या 100 कोटींच्या वसुलीच्या आरोपांप्रकरणी सीबीआयने देशमुखांना ताब्यात घेतलं. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली पहायला मिळाली.

अनिल देशमुख (Anil Deshmukh) 100 कोटींच्या वसूली प्रकरणामुळे चांगलेच अडचणीत सापडले. अनिल देशमुख यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.

100 कोटींच्या वसूली प्रकरणात जेलमध्ये असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या समर्थनार्थ आता राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

गृहमंत्र्यांना कोण देतंय 100 कोटी? मीही गृहमंत्री होतो,अशा शब्दात छगन भुजबळांनी अनिल देशमुख यांची पाठराखण केली आहे. पंढरपूर येथे माध्यमांशी संवाद साधताना भुजबळ बोलत होते.

अनिल देशमुख आणि दुसरी व्यक्ती म्हणे असे बोलले हे तिसरा चौथ्याला सांगतोय. अनिल देशमुख कोणाला बोलले. आपण लांबून ऐकले पण आपणास बोलले नसल्याचे सचिन वाझे याने चांदीवाल कमिशनला सांगितले होते.

काही करून मोठ्या रकमांचे आरोप ठेवायचे मग ईडीची केस करायची आणि जास्तीत जास्त दिवस जेलमध्ये ठेवायचा हा सर्व ईडीचा प्रकार असल्याची टीका छगन भुजबळ यांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या – 

  कोरोनाच्या XE व्हेरियंटबाबात तज्ज्ञांचा गंभीर इशारा म्हणाले…

  Health | उन्हाळ्यात आंबा खाल्ल्यानंतर ‘या’ गोष्टींचं सेवन टाळा

“गजा मारणेचंही स्वागत झालं होतं, मग तो काही आदर्श पुरूष आहे का?”

“कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा??, कारवाई झाली की बोंबलायचं अन्…”

ढोल ताशाच्या गजरात संजय राऊतांचं मुंबईत जंगी स्वागत, म्हणाले…