“…तर देशात पुन्हा लॉकडाऊन करावं लागेल”

नवी दिल्ली |   कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या अनेक देशात टाळेबंदी सुरू आहे. गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून बऱ्याचश्या देशांत टाळेबंदी आहे. आता ही टाळेबंदी उठवण्याची पवालं प्रशासन टाकताना दिसून येत आहे. भारत देखील सध्या याच स्थितीत आहे. अशातच जागतिक आरोग्य संघटनेने गंभीर इशारा दिला आहे.

जर योग्य नियोजन नसताना टाळेबंदी उठवण्याची घाई कराल तर परिस्थिती हाताबाहेर जाऊन चिंता वाढू शकते. मग पुन्हा एकदा देशात लॉकडाऊन करण्याची गरज भासू शकते, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस यांनी दिला आहे.

निर्बंध शिथील झाल्यानंतरही लोकांवर लक्ष ठेवण्याची गरज असून आरोग्य यंत्रणाही तयार असली पाहिजे, असं सांगत असताना जरी करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला तरी पूर्वीप्रमाणे सगळं काही सुरळीत होण्याची शक्यता कमी आहे, अशी भिती त्यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव नक्की कमी होईल, असा दिलासा देत जगभरातील आरोग्य यंत्रणा भक्कम करण्यासाठी ही योग्य संधी असल्याचं टेड्रोस म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-अतिश्रीमंत व्यक्तींच्या संपत्तीवर 2 टक्के कोरोना कर लावा; देशातल्या विचारवंतांची मागणी

-आजच्या संकटातून मात करण्याची प्रेरणा आपण बुद्धांकडून घेऊ शकतो- मु्ख्यमंत्री उद्धव ठाकरे

-‘राज’पुत्राचा मुख्यमंत्र्यांना फोन; उद्धव यांचा देखील सकारात्मक प्रतिसाद

-बुद्ध हे केवळ नाव नसून मानवतेचा विचार आहे- पंतप्रधान नरेंद्र मोदी

-कालच्या प्रकारावर देवेंद्र फडणवीसांनी संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागावी, छत्रपती संभाजीराजेंची मागणी